शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

IMF चं कर्ज फेडायचंय, पैसे द्या; सैन्यासमोर मुस्लीम देशाने पसरले हात; भारताकडेही मागितली मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 17:06 IST

1 / 10
इजिप्त या मुस्लिम आफ्रिकन देशाला सध्या गंभीर आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. या संकटाला तोंड देण्यासाठी इजिप्तने मोठ्या प्रमाणात कर्ज घेतले आहे आणि ते परतफेड करण्यास ते असमर्थ आहे.
2 / 10
इजिप्त सरकारने कर्ज फेडण्यासाठी लष्कराची मदत मागितली होती, परंतु ती नाकारण्यात आली. आता इजिप्तच्या लष्कराकडे संपूर्ण देशाचे कर्ज फेडण्याइतका मोठा गुप्त खजिना आहे हे उघड झाले आहे. लष्कराच्या भीतीमुळे इजिप्त सरकार इच्छा असूनही तो पैसा घेऊ शकत नाही.
3 / 10
इजिप्तच्या सरकारला आयएमएफचे कर्ज फेडावे लागेल परंतु त्यांच्याकडे पैसेच नाहीत. परिणामी ते तसे करू शकले नाही. इजिप्तचे लष्कर पडद्यामागून देशावरील आपले नियंत्रण मजबूत करत आहे, ज्यामुळे नागरी सरकार कमकुवत होत आहे असं विश्लेषकांचे म्हणणे आहे.
4 / 10
मिडल ईस्ट आयच्या अहवालानुसार, इजिप्तचा परकीय चलन साठा कमी होत चालला आहे आणि अर्थव्यवस्था कोसळण्याच्या मार्गावर आहे. इजिप्तला डिसेंबरमध्ये आयएमएफला ७५ कोटी डॉलर कर्ज परत करायचे होते, परंतु ते ते करू शकले नाही.
5 / 10
इजिप्तला आयएमएफकडून कर्जाच्या पुढील हप्त्यातून रक्कम आणि त्याचे व्याज वजा करावे अशी वाटाघाटी करावी लागली. आयएमएफ आणि इजिप्शियन सरकारने हा करार सार्वजनिक केलेला नाही. 'सरकार डिसेंबरपर्यंत ६३.७ अब्ज डॉलर कर्ज घेऊ इच्छित होते, परंतु देशांतर्गत बँकांनी नकार दिला असं इजिप्शियन बँकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
6 / 10
आता दुसरा कोणताही पर्याय उरला नसल्याने सरकारने कर्जासाठी लष्कराकडे हात पसरले. परंतु संरक्षणमंत्र्यांकडे प्रकरण उपस्थित केल्यानंतरही इजिप्शियन लष्कराने कर्ज देण्यास नकार दिला असं अधिकाऱ्याने सांगितले.
7 / 10
पंतप्रधान मुस्तफा मादबोली यांनी स्वतः संरक्षणमंत्र्यांशी चर्चा केली. इजिप्शियन पंतप्रधानांनी हे राष्ट्रपती अल-सिसी यांना सांगितले की नाही हे अद्याप माहित नाही. अल-सिसी हे इजिप्शियन लष्कराचे सर्वोच्च कमांडर आहेत आणि सर्व निधी ते नियंत्रित करतात.
8 / 10
इजिप्तला जानेवारी २७ कोटी ७० लाख डॉलरचं कर्ज फेडायचे होते. २०२५ या वर्षांत एकूण ६० अब्ज डॉलर इजिप्तला परतफेड करायचे होते. देशातील सैन्याकडे मोठ्या प्रमाणात डॉलरचा साठा आहे. परंतु या साठ्यापर्यंत इजिप्त सरकारला पोहचता येत नाही.
9 / 10
हा डॉलरचा साठा इतका राखीव आहे की इजिप्त देशाचं एकूण परदेशी कर्ज १६१ अब्ज डॉलर यापेक्षाही जास्त आहे. सैन्याचा पैसा देशातील २ सरकारी बँकेत जमा आहे. तरीही इजिप्त सरकारला या पैशांवर नियंत्रण करता येत नाही.
10 / 10
इजिप्तमध्ये खाणकामातून काढलेल्या सोन्यापैकी ५० टक्के सोने थेट लष्कराकडे जाते. इजिप्तच्या राष्ट्राध्यक्षांनी त्यांच्या आर्थिक संकटाचे निराकरण करण्यासाठी भारताची मदत मागितली आहे. ते भारत दौऱ्यावर आले होते. भारतासह त्यांनी पाकिस्तानचाही दौरा केला आणि संकटाचा सामना करण्यासाठी मदत मागितली. इजिप्तला पूर्वी सौदी अरेबिया आणि युएई या आखाती देशांकडून मदत मिळत होती, परंतु आता ती थांबली आहे.
टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तान