बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 16:11 IST
1 / 10अफगाणिस्तानातील बगरम हवाई तळ पुन्हा चर्चेत आला. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हा हवाई तळ पुन्हा परत करा म्हणत धमकीच दिली. त्यामुळे एक हवाई तळासाठी ट्रम्प पार धमकीपर्यंत का गेले असावे? त्याचं कारण बदलत्या आहे जागतिक राजकारणात!2 / 10अफगाणिस्तानातील बगरम हवाई तळ अमेरिकेसाठी एक अत्यंत महत्त्वाचे लष्करी तळ राहिले आहे. अफगाणिस्तानमधील अमेरिकेच्या लष्करी कारवायांचे ते केंद्रस्थान होते. जागतिक भू-राजकीय दृष्टीने त्याचे महत्त्व अनेक कारणांमुळे आतापर्यंत राहिले आहे.3 / 10बगरम हे फक्त लष्कराचे एक हवाई तळ इथपर्यंत मर्यादित नाहीये; तर अमेरिकेच्या गेल्या दोन दशकांतील अफगाणिस्तानमधील युद्ध धोरणांचा तो कणा राहिलेला आहे. २००१ मध्ये अमेरिकेने अफगाणिस्तानवर हल्ला केल्यानंतर बगरम हवाई तळ हा अमेरिकेच्या आणि नाटो (NATO) सैन्याच्या सर्व प्रमुख लष्करी आणि हवाई कारवायांचा मुख्य तळ बनला.4 / 10इथूनच दहशतवादविरोधी मोहिमा, हवाई हल्ले आणि सैन्याच्या हालचाली नियंत्रित केल्या गेल्या. म्हणजे ९/११ च्या हल्ल्यानंतर अमेरिकेने अल-कायदा आणि तालिबानसारख्या संघटनांना संपवण्यासाठी जी जागतिक लष्करी मोहीम हाती घेतली होती, त्या मोहिमेतील हा एक महत्त्वाचा तळ होता.5 / 10बगरम या हवाई तळावरूनच अनेक विशेष ऑपरेशन आणि हवाई हल्ले केले गेले. हे एक लष्करी तळ नाहीये, तर सैन्याची रसद, शस्त्रे, अन्न आणि इतर आवश्यक सामग्री पुरवण्यासाठीचे एक मोठे लॉजिस्टिक हब सुद्धा राहिले आहे. या तळावरूनच हजारो सैनिकांना आणि कोट्यवधी रुपयांची साहित्य सामग्रीला पाठवली गेली.6 / 10आता अमेरिका बगरम हवाई तळासाठी धमकी देण्यापर्यंत उतरलीये याचं आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे जागतिक राजकारण! हे हवाई तळ अफगाणिस्तान असले, तरी ते फक्त त्या देशापुरते मर्यादित नाहीये. तिथून संपूर्ण मध्य आशिया आणि त्यापुढील प्रदेशांवर नजर ठेवली जाऊ शकते.7 / 10बगरम हवाई तळाचा उपयोग अमेरिका ही चीन आणि रशिया यांची वाढती जवळीकता आणि प्रभावावर लक्ष ठेवण्यासाठी करत राहिलेली आहे. हा तळ मध्य आशियाच्या अगदी मध्यभागी आहे. त्यामुळे अमेरिकेला या प्रदेशातील घडामोडींवर नियंत्रण ठेवण्यास मदत होत होती.8 / 10बगरम हवाई तळावरून अमेरिकेला इराणवरही दबाव ठेवणे शक्य होत होते. गेल्या काही महिन्यात इराणने थेट इस्रायल आणि अमेरिकेविरोधातच दंड थोपटले आहेत. येथून अमेरिकेला इराणच्या आण्विक कार्यक्रमावर लक्ष ठेवणे सोपं आहे. 9 / 10२०२१ मध्ये अफगाणिस्तानात गृहयुद्ध भडकले. तालिबानने सरकारला सत्तेतून खाली खेचले आणि देशाची सूत्रे हाती घेतली. त्याच घडामोंडीच्या काळात २०२१ मध्ये अमेरिकेने अचानक बगरम हवाई तळ सोडला आणि तालिबानने त्यावर ताबा मिळवला. 10 / 10अनेक तज्ञांनी अमेरिकेच्या या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. बगरम हवाई तळ सोडल्यामुळे अमेरिकेचा अफगाणिस्तानमधील आणि एकंदरीत मध्य आशियातील प्रभाव कमी झाला आहे. आता तालिबान या तळाचा वापर करत आहे, ज्यामुळे भविष्यात या प्रदेशातील सुरक्षा समीकरणे बदलू शकतात. पण, अमेरिकेला पुन्हा हा तळ आपल्या ताब्यात हवा आहे.