शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Coronavirus in America : ICU फुल, कर्मचाऱ्यांची कमतरता; अमेरिकेतील अनेक राज्यांत डेल्टा व्हेरिएंटचा कहर!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2021 10:32 PM

1 / 9
वॉशिंग्टन : अमेरिकेत कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी लसीकरण मोठ्या प्रमाणात करण्यात आले आहे. असे असतानाही न्यू इंग्लंड राज्यातील बर्‍याच भागात वाढता कोरोना संसर्ग वाढताना दिसत आहे. कोरोनाचा डेल्टा व्हेरिएंटचा प्रादुर्भाव याठिकाणी जास्त दिसून येत आहेत.
2 / 9
येथील सर्व रुग्णालयांचे अतिदक्षता विभाग (ICU) रुग्णांनी भरले आहे आणि कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. सरकारी कर्मचारी हे लस न घेतलेल्या लोकांना लसीकरण करण्यासाठी आवाहन करत आहेत, कारण 90 टक्के लसीकरणानंतरच सामुदायिक प्रतिकारशक्ती विकसित होईल, असे म्हटले जात आहे.
3 / 9
वर्मोंट राज्यातील कोरोना प्रकरणावर लक्ष ठेवणारे आर्थिक नियामक आयुक्त मायकल पिसियाक म्हणाले, 'ही स्पष्टपणे आपल्या सर्वांसाठी निराशाजनक परिस्थिती आहे. मुले शाळेत सुरक्षित असावीत असे आम्हाला वाटते. पालकांनी आपल्या मुलांच्या आरोग्याची आणि शिक्षणाची चिंता करू नये अशी, आमची इच्छा आहे.
4 / 9
असोसिएटेड प्रेसच्या आकडेवारीनुसार, न्यू इंग्लंड, वर्मोंट, कनेक्टिकट, मेइन, रोड आयलँड आणि मॅसॅच्युसेट्स या पाच राज्यात सर्वाधिक लसीकरण झाले आहे. तर न्यू हॅम्पशायर 10 व्या क्रमांकावर आहे. असे असूनही, काही कारणास्तव शेकडो-हजारो लोकांनी लसीकरण केले नाही आणि ते असुरक्षित आहेत.
5 / 9
मध्य मॅसॅच्युसेट्समधील सर्वात मोठी आरोग्य यंत्रणा यूमास मेमोरियल हेल्थचे प्रमुख म्हणाले की, जूनच्या तुलनेत प्रादेशिक रुग्णालयात दाखल होण्याच्या संख्येत 20 पटीने वाढ झाली आहे आणि आणखी आयसीयू बेड शिल्लक नाहीत.
6 / 9
कोरोना महामारीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर, कनेक्टिकटच्या विधानसभेने राज्यपालांना दिलेल्या आपत्कालीन अधिकारांचा कालावधी वाढवला जेणेकरून तो कोरोनाच्या नवीन लाटेचा अधिक सहजपणे सामना करू शकेल.
7 / 9
वर्मोंटमध्ये, जेथे जास्त लसीकरण आणि रुग्णालयात दाखल होत होते, सप्टेंबर हा सर्वात घातक महिना असल्याचे सिद्ध झाले आहे. 22 सप्टेंबर रोजी मेइनमध्ये सुमारे 90 रुग्णांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले.
8 / 9
मेइनमधील 48 बेडच्या यॉर्क हॉस्पिटलमध्ये संसर्गजन्य रोगांचे तज्ज्ञ डॉ. ग्रेटचेन वोल्पे म्हणाले, डेल्टा व्हेरिएंटमधून संसर्गाच्या वाढत्या प्रकरणांमुळे रुग्णांना उपचार मिळणे कठीण होत आहे.
9 / 9
विशेष म्हणजे, शुक्रवारी, अमेरिकेत साथीमुळे झालेल्या मृत्यूंची संख्या सात लाखांच्या पुढे गेली. डेल्टा व्हेरिएंटच्या संसर्गामुळे अमेरिकेचा दक्षिण भाग मृत्यूचे केंद्र बनला आहे, तर न्यू इंग्लंडमध्येही कोरोनाची प्रकरणे वाढत आहेत.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसAmericaअमेरिका