शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

America: अलास्कामध्ये 8.2 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, प्रशानाकडून त्सुनामीचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2021 4:59 PM

1 / 8
अमेरिकेतील अलास्का राज्यात बुधवारी रात्री 11:15 वाजेच्या सुमारास 8.2 रिश्टर स्केलचे भूकंपाचे तीव्र झटके जाणवले. या भूकंपानंतर यूनायटेड स्टेट्स जियोलॉजिकल सर्वे (USGS) ने त्सुनामीचा इशारा दिला आहे.
2 / 8
USGS ने सांगिल्यानुसार, भूकंपाचे केंद्र पेरीविलेपासून 91 किलोमीटर दक्षिण-पूर्वमध्ये होते. पेरीविल अलास्कातील सर्वात मोठे शहर एंकरेजपासून 500 मैलाच्या अंतरावर वसलेले लहानशे गाव आहे. अलास्का सक्रिय पॅसिफिक रिंग ऑफ फायरचा एक भाग आहे.(संग्रहित फोटो)
3 / 8
मागच्या वर्षी ऑक्टोबरमध्ये अलास्काच्या दक्षिण किनारपट्टीवर 7.5 तीव्रतेच्या भूकंपामुळे त्सुनामी लाटा आल्या होत्या. पण, सुदैवाने त्यात कुठलीही जीवितहानी झाली नाही.(संग्रहित फोटो)
4 / 8
तर, मार्च 1964 मध्ये अलास्कात 9.2 तीव्रतेचा भूकंप आला होता. तो उत्तर अमेरिकेतला आतापर्यंतचा सर्वात मोठा भूकंप होता. त्या भूकंपवामुळे एंकरेज परिसर उद्धवस्त झाला होता.
5 / 8
तसेच, त्सुनामीने अलास्काची खाड़ी, अमेरिकेतील पश्चिमी किनारपट्टी आणि हवाईमध्ये खूप नुकसान झाले होते. त्या घटनेत 250 पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला होता.(संग्रहित फोटो)
6 / 8
भूगर्भ शास्त्रज्ञांनी सांगितल्यानुसार बहुतेक भूकंप जमिनीत असलेल्या टेक्टोनिकल प्लेटा हलल्यामुळे येतात. याशिवाय, उल्का कोसळणे आणि ज्वालामुखी उद्रेक, माइन टेस्टिंग आणि न्यूक्लियर टेस्टिंगमुळेही भूकंप येऊ शकतात.(संग्रहित फोटो)
7 / 8
रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता मोजली जाते. 2.0 किंवा 3.0 तीव्रतेचा भूकंप हलका असतो, तर 6 तीव्रतेच्या भूकंपाला शक्तीशाली म्हटले जाते.
8 / 8
भूकंपाच्या तीव्रतेचा अंदाज त्याच्या केंद्र (एपिसेंटर) मधून निघालेल्या ऊर्जेच्या तरंगातून लावला जातो. या तरंगामुळे शेकडो किलोमीटर दूरपर हदरे बसतात, जमिनीत भेगा पडतात. (संग्रहित फोटो)
टॅग्स :AmericaअमेरिकाEarthquakeभूकंप