शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

चीनच्या 'मच्छर'नंतर आता 'झुरळ' बनणार युद्धभूमीतलं नवं शस्त्र; 'या' देशानं बनवला खतरनाक प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 08:59 IST

1 / 10
पाकिस्तानी दहशतवाद्यांविरोधात भारताने सुरू केलेले ऑपरेशन सिंदूर असो वा गेल्या ३ वर्षापासून जगात सुरू असलेले रशिया-युक्रेन युद्ध असेल. या सर्वात आत्मघातकी ड्रोनचा वापर मोठ्या प्रमाणात झाला. अलीकडच्या काळात युद्धभूमीवर ड्रोन हे मोठे शस्त्र म्हणून पुढे आले आहे. बदलत्या तंत्रज्ञानानुसार ड्रोन हल्ल्याला अनेक देश प्राधान्य देत आहेत.
2 / 10
यातच आता डिफेन्स सेक्टरमध्ये काम करणारी कंपनीने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. कंपनी झुरळ आणि मानवरहित एआय आधारित शस्त्रे बनवण्याचा पर्याय शोधून काढत आहेत. रशिया युक्रेन यांच्यातील युद्धाला ३ वर्षाहून अधिक काळ लोटला. युरोपला आता समजले आहे की त्यांच्या सुरक्षेसाठी अमेरिका आणि NATO वर भरवसा ठेवून चालणार नाही. त्यामुळेच द्वितीय विश्वयुद्धानंतर युरोपात पुन्हा एकदा शस्त्रे उत्पादन करण्यासाठी स्पर्धा सुरू झाली आहे. ज्यात सर्वात जास्त खर्च जर्मनी करत आहे.
3 / 10
युरोपात अनेक छोटे छोटे देश आहेत. ज्याठिकाणी शस्त्रे उत्पादन करण्यासाठी कंपन्यांना वेगवेगळे नियम आहेत. तर दुसरीकडे अमेरिकेत Lockheed Martin, RTX सारख्या मोठ्या कंपन्या पहिल्यापासून मजबूत आहेत आणि सॅटेलाईट, फायटर जेट आणि स्मार्ट शस्त्रांमध्ये त्यांचा दबदबा आहे. त्यातच जर्मनीने निर्णय घेतला आहे की, २०२९ पर्यंत ते संरक्षण खात्यावरील खर्च तीन पटीने वाढवून वर्षाला १६२ अरब युरो करतील.
4 / 10
जर्मनीत झालं सैन्य विकेंद्रीकरण - दुसऱ्या महायुद्धानंतर जर्मनीला सुरक्षेची गॅरंटी अमेरिकेने दिली आणि जर्मनीला मर्यादित लष्करी संसाधने एकत्रित करण्याची परवानगी होती म्हणून जर्मनीनेही आपले संरक्षण बजेट कमी करून ते इतरत्र खर्च करण्यास सुरुवात केली. परंतु रशिया-युक्रेन दिर्घकाळ चाललेल्या युद्धामुळे जर्मनीला आपली सुरक्षा अमेरिकेच्या हातात सोडणे धोक्यापेक्षा कमी नाही हे कळले आहे.
5 / 10
जर्मनी सरकारने देशात सैन्य स्टार्टअप फंडिंग सुरू केले आहे. ज्याचा परिणाम म्हणून जर्मनी आता हेरगिरी करणारे झुरळ, मानवरहित पाणबुडी आणि AI बेस्ड टँक उत्पादनावर भर दिला आहे. युक्रेन युद्धानंतर संरक्षण क्षेत्रात काम करण्याबाबत समाजात जो संकोच होता तो संपला आहे. आता मोठ्या प्रमाणात लोक संरक्षण तंत्रज्ञानात नवीन आयडिया घेऊन येतायेत असं सायबर इनोवेशन हबचे हेड स्वेन वीजेगेनर यांनी सांगितले
6 / 10
Swarm Biotactis नावाची कंपनी साइबोर्ग कॉकरोच बनवत आहे म्हणजे खऱ्या झुरळांना लहान बॅकपॅक बसवले जात आहेत आणि त्यांच्यावर कॅमेरे बसवले जात आहेत जेणेकरून ते शत्रूच्या परिसरात जाऊन ते डेटा गोळा करू शकतील. त्यांच्या हालचाली विद्युत सिग्नलद्वारे नियंत्रित केल्या जाऊ शकतात
7 / 10
जर्मनीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजेंस रोबोट्स, मिनी-पाणबुड्या आणि गुप्तचर झुरळांवर काम करणारे अनेक संरक्षण स्टार्टअप्स आहेत ज्यांना सरकार पाठबळ देत आहे. विशष म्हणजे जिवंत कीटकांवर आधारित बायो-रोबोट न्यूरल स्टिम्युलेशन, सेन्सर्स आणि सुरक्षित कम्युनिकेशन मॉड्यूलने सुसज्ज आहेत. हे एकटे चालवता येतात किंवा समुहामध्ये वापरले जाऊ शकतात असं कंपनीचे सीईओ स्टीफन विल्हेम यांनी म्हटले.
8 / 10
याआधी चीननेही असाच अविष्कार पुढे आणला. ज्यात डासांच्या आकाराचा नवीन ड्रोनवर काम सुरू केले आहे. चिनी वैज्ञानिकांनी एक मिलिट्री ड्रोन तयार केले आहे. या ड्रोनची साईज आणि आकार एका मच्छरासारखा आहे. मच्छरच्या आकाराचे हे ड्रोन युद्धाच्या मैदानात विध्वंस करण्यासाठी सज्ज आहेत.
9 / 10
एका व्हिडिओत चिनी शास्त्रज्ञ डासांसारखा दिसणारा रोबोट हातात धरलेले दिसत आहेत. हे ड्रोन अनेक प्रकारच्या लष्करी आणि इतर मोहिमांसाठी योग्य असतील. अशा ड्रोनचा वापर लोकांचे खासगी संभाषण ऐकण्यासाठी, लोकांचा मागोवा घेण्यासाठी किंवा पासवर्ड चोरण्यासाठी केला जाऊ शकतो, असा दावा तज्ञांनी केला आहे.
10 / 10
चिनी वैज्ञानिकांनी त्यांच्या मिलिट्री ऑपरेशनसाठी मच्छरच्या आकाराचे एक खूप लहान ड्रोन तयार केले आहे. हे माइको ड्रोन नॅशनल युनिवर्सिटी ऑफ डिफेन्स टेक्नोलॉजीच्या रोबोटिक्स प्रयोगशाळेत विकसित करण्यात आले आहे. जे मध्य चीनच्या हुनान प्रांतात आहे.
टॅग्स :chinaचीनRussia Ukrainयुक्रेन आणि रशियाGermanyजर्मनीArtificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्स