1 / 9अनेक अभिनेत्री वेळोवेळी त्यांच्यासोबत झालेले गैरवर्तन किंवा त्यांच्या झालेल्या शोषणाबाबत खुलासा करून खळबळ उडवून देत असतात. असाच एका खुलासा एका अभिनेत्रीने केला आहे.2 / 9या प्रसिद्ध अभिनेत्रीवर तिच्या बॉयफ्रेन्डने रेप केला. इतकंच नाही तर तिला चार दिवस रूममध्ये बंद ठेवलं. जेव्हा अभिनेत्रीने त्याला विरोध केला तर त्याने हसत हसत तो कसा बरोबर आहे हे सांगितलं. 3 / 9अभिनेत्री Juliet Ibrahm ने एका मुलाखतीतून हा खुलासा केला. ३६ वर्षीय juliet घानाची राहणारी आहे आणि Nollywood म्हणजेच नायजेरियन फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. 4 / 9नुकत्यात दिलेल्या एका मुलाखतीत तिने तिच्या एक्स-बॉयफ्रेन्डबाबत खळबळजनक खुलासा केलाय. अभिनेत्रीने सांगितलं की, कशाप्रकारे पार्टनरच्या वागण्याला कंटाळून तिने त्याला सोडलं.5 / 9Juliet Ibrahim म्हणाली की, ती एका व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये होती. पण त्याचं नेचर फारच खराब होतं. त्याला दररोज माझ्यासोबत काहीना काही करायचं होतं. 6 / 9माझी इच्छा नसतानाही तो माझ्यासोबत संबंध ठेवत होता आणि विरोध केला तर म्हणत होता की, 'आपण दोघे रिलेशनशिपमध्ये आहोत, हा रेप नाहीये'.7 / 9juliet नुसार तो एक उंचपुरा व्यक्ती होता. जेव्हा मी त्याला म्हणाले की, तो रेप करत आहे, तर तो म्हणाला की आपण रिलेशनशिपमध्ये आहोत. त्यानंतर त्याने मला खाली पाडलं. त्याला जे वाटत होतं ते तो करत होता. तो हसत होता. मी त्याला म्हणाले की, तू एक रेपिस्ट आहे. पण त्याने काही ऐकलं नाही.8 / 9Juliet म्हणाली की, मी त्या रिलेशनशिपमधून बाहेर पडण्यासाठी खूप संघर्ष केला. कारण त्याने मला अनेक दिवस त्याच्या घरात बंद करून ठेवलं होतं. त्याने अनेक दिवस माझा रेप केला. त्यानंतर माझ्या बहिणीने माझी मदत केली. 9 / 9अभिनेत्री म्हणाली की, कुणालाही डेट करण्याआधी त्या व्यक्तीची मानसिकता जाणून घ्यायला हवी. Juliet Ibrahim ने इतर महिलांना सल्ला दिला की, त्यांनी कौटुंबिक अत्याचाराविरोधात आवाज उठवला पाहिजे.