सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 00:10 IST
1 / 5संपूर्ण जगभरात वातावरणात होत असलेले बदल हा चिंतेचा विषय ठरत आहे. याचदरम्यान, यंदाच्या हिवाळ्यात सौदी अरेबियातील वाळवंटामध्ये बर्फाची चादर पसरली आहे. वाळंटामध्ये झालेल्या या हिमवृष्टीमुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. तसेच या हिमवृष्टीने जगभरात होत असलेल्या वातावरणातील बदलांकडे सर्वांचं लक्ष वेधलं गेलं आहे. 2 / 5सौदी अरेबियातील जेबेल अल-लॉजच्या उंच भागात ही बर्फाची चादर पसरली आहे. हा भाग समुद्र सपाटीपासून सुमारे २ हजार ६०० मीटर उंचीवर आहे. याशिवाय हेल शहराच्या अनेक भागात हिमवृष्टी झाली आहे. त्यामुळे सौदी अरेबियातील अनेक भागांत तापमान हे शून्य डिग्री सेल्सियसच्याही खाली पोहोचलले आहे. 3 / 5 नॅशनल सेंटर फॉर मेटियोरोलॉजीने दिलेल्या माहितीनुसार सौदी अरेबियामध्ये मध्य आणि उत्तर भागात येणाऱ्या थंड हवांमुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच पाऊस आणणाऱ्या ढगांमुळेही ही परिस्थिती निर्माण झाली आहे. 4 / 5हिमवृष्टीसोबतच सौदी अरेबियातील अम्मार, अल उला गव्हर्नरेट, अल अयनाह, शक्का आणि आसपाच्या परिसरामध्ये हलका पाऊस पडला आहे. याशिवाय कासिम, रियाध आणि पूर्व परिसरामध्येही मुसळधार पाऊस पडला आहे. 5 / 5 संयुक्त अरब अमिराती आणि सौदी अरेबियामध्ये अचानक झालेली हिमवृष्टी, दक्षिण आशियामध्ये वढत असलेला उन्हाळा आमि मध्यपूर्वेमध्ये अचानक येणारे पूर, युरोप उत्तर अमेरिकेतील अनेक भागात होत असलेली अनपेक्षित हिमवृष्टी यामुळे वातावरणातील बदलांबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.