अंतराळातील ८ दिवसांचा मुक्काम ९ महिने लांबला, आता NASA सुनिता विल्यम्स यांना किती ओव्हर टाइम देणार? आकडा वाचून विस्फारतील डोळे
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2025 19:50 IST
1 / 5मागचे नऊ महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात अडकून असलेल्या भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनिता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर हे लवकरच पृथ्वीवर परतणार आहेत, अशी माहिती समोर येत आहे. 2 / 5खरंतर सुनिता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे आठ दिवसांच्या मोहिमेवर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात गेले होते. मात्र तांत्रिक बिघाडामुळे ते जवळपास नऊ महिने अंतराळातच अडकडून पडले. अशा परिस्थितीत आता सुनिता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना अंतराळातील वाढलेल्या मुक्कामाबाबत किती नासाकडून किती वेतन मिळणार, याची चर्चा सुरू झाली आहे. 3 / 5नासाचे सेवानिवृत्त अंतराळवीर कॅडी कोलमेन यांनी दिलेल्या माहितीनुसार अंतराळवीरांना ओव्हरटाइमचं वेतन मिळत नाही. अंतराळवीर हे सरकारी कर्मचारी मानले जात असल्याने त्यांनी अंतराळामध्ये व्यतित केलेला वेळ हा सामान्य सरकारी प्रवासाप्रमाणे मानला जातो. या दरम्यान, त्यांना नियमित वेतन मिळत राहते. तसेच त्यांच्या जेवणाखाण्याचा खर्च नाकाकडून केला जातो. मात्र त्यांना दैनिक भत्ता मिळत राहतो. 4 / 5सुनिता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे जीएस-१५ वेतनश्रेणीमध्ये येतात. ही केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सर्वोच्च वेतनश्रेणी आहे. या श्रेणीतील कर्मचाऱ्यांना भारतीय चलनानुसार अंदाजे १.०८ कोटी रुपये ते १.४१ कोटी रुपये एवढं वेतन मिळतं. आता आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातील नऊ महिन्यांच्या वास्तव्यासाठी त्यांना अंदाजे ८१ लाख ते १.०५ कोटी रुपयांदरम्यान वेतन मिळेल. 5 / 5नासाने दिलेल्या माहितीनुसार सुनिता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी हे अंतराळात अडकलेले नाहीत. तर ते अंतराळ स्थानकामध्ये काम करत आहेत. आता त्यांना सुखरूप पृथ्वीवर आणण्याची मोहीम सुरू झाली आहे. तसेच स्पेसएक्स ड्रॅगन अंतराळ यानाच्या माध्यमातून ते १९ मार्चच्या आधी पृथ्वीवर परतण्याची शक्यता आहे.