शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2025 23:03 IST

1 / 7
गेल्या काही काळात एकापेक्षा अधिक पार्टनरसोबत रिलेशन ठेवणाऱ्यांचं प्रमाण वाढलेलं आहे. तसेच त्यामधून अनेक गंभीर गुन्हेही घडत आहेत. दरम्यान, याबाबत एका सर्वेमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. या सर्वेनुसार दर दोन महिलांमधील एक महिला ही नातं तुटण्याच्या परिस्थितीत आधीच अन्य पुरुषाचा बॅकअप पार्टनर म्हणून विचार करून ठेवते, असे या अहवालामध्ये म्हटले आहे.
2 / 7
हा सर्वे युनायटेड किंग्डममधील वनपोल नावाच्या संस्थेने केला आहे. तसेच यामध्ये यामध्ये एक हजार महिलांना प्रश्न विचारण्यात आले. त्यामध्ये विवाहित महिलांचाही समावेश होता. या सर्वेमधून समोर आलेला निष्कर्ष धक्कादायक होता. सुमारे ५० टक्के महिलांनी आपल्या मनात एक बॅकअप पार्टनर आधीपासून तयार असतो, ज्यामुळे त्यांचं नातं तुटलं तर दुसऱ्या जोडीदाराकडे जाता येतं, हे मान्य केलं. यालाच हल्ली बेंचिंग म्हणतात.
3 / 7
या सर्वेमध्ये सहभागी महिलांनी हेही सांगितलं की, हा बॅकअप पार्टनर कुणीतरी जुना मित्र असू शकतो, ज्याने त्यांच्यासोबतच्या रोमँटिक संबंधाबाबत रस दाखवलेला असतो. तर काही महिलांनी असा बॅकअप पार्टनर हा त्यांचा एक्स बॉयफ्रेंड, सोबत काम करणारा सहकारी किंवा जिममधील कुणी ओळखीचा पुरुष यांचीही नावं घेतली.
4 / 7
याचा अर्थ महिलांचा बॅकअप पार्टनर हा कुणी अनोळखी पुरुष नाही तर तर अशी व्यक्ती असतो ज्याच्याशी त्यांचं भावनिक बोलणं झालेलं असतं. तसेच जर त्यांचं सध्या सुरू असलेलं नातं तुटलं तर या व्यक्ती त्यांना समजावण्यासाठी भावनिक आधार देण्यासाठी धावून येतील, असा महिलांना विश्वास असतो.
5 / 7
या ट्रेंडमागे अनेक धक्कादायक कारणं असू शकतात. काही महिला सांगतात की, त्यांना नात्यामध्ये भावनिक सुरक्षेची आवश्यकता असते. सध्याच्या जोडीदारासोबत काही बाबतीत असहमती किंवा भावनात्मक दुरावा निर्माण झाला तर त्या आपल्या मनामध्ये त्या आधीपासून भावनिक जवळीक वाटणाऱ्या पुरुषाला स्थान देतात. त्यामुळे आपलं नातं तुटलं तरी आपण एकट्या पडणार नाही, असं या महिलांना वाटतं.
6 / 7
काही तज्ज्ञांच्या मते सोशल मीडिया आणि व्हर्च्युअल कनेक्शनमुळे लोकांना अधिक पर्याय उपलब्ध झाले आहेत. आधी नातं निभावण्याचा विचार लोक करायचे. मात्र आता एका व्यक्तीसोबत नातं टिकलं नाही तर दुसऱ्यासोबत जवळीक करता येईल. या हेतूने दरवेळी आपल्याकडे बॅकअप प्लॅनही तयार ठेवतात.
7 / 7
मात्र या सर्वेमुळे काही गंभीर प्रश्नही उपस्थित झाले आहेत. नात्यांमधील हा बॅकअप माईंडसेट एकमेकांवरील विश्वास संपुष्टात आणत आहे का, असा प्रश्न निर्माण होत आहे. एका खऱ्या नात्याचा पाया हा विश्वास आणि समर्पणावर टिकून असतो. जर कुणी हे नातं टिकलं नाही तर दुसरा चालेल असा विचार करून कायम चालत राहिला तर तो पूर्ण मनाने आपल्या सध्याच्या नात्यात भावनिक गुंतवणूक करू शकेल का? हाही प्रश्न निर्माण होतो. दरम्यान, अनेक मानसोपचार तज्ज्ञ सांगतात की, हा विचार नात्यामधील गहिरेपणा कमी करत आहे. त्यामुळे जोडीदारांमधील प्रामाणिकपणा, भावनात्मक जवळीक आणि दीर्घकाळापर्यंत साथ निभावण्यावर परिणाम होऊ शकतो.
टॅग्स :relationshipरिलेशनशिपSocialसामाजिकInternationalआंतरराष्ट्रीय