अमेरिकन कंपनीनं अचानक नोकरीवरून काढलं; युवकाचं ६ महिन्यातच नशीब पालटलं, महिन्याला ४४ लाख कमाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2025 13:02 IST
1 / 10टॅरिफ आणि एच१ बी व्हिसा यावरून भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत. त्यातच नोकरी आणि करिअरबद्दल अनेकांना चिंता लागून राहिली आहे. कधी कुणाची नोकरी जाईल अथवा व्यवसाय ठप्प होईल हे कुणी सांगू शकत नाही. त्यात हर्षिल तोमर याची कहाणी चर्चेत आली आहे.2 / 10हर्षिल तोमर हा भारतातूनच अमेरिकेतील एका कंपनीसाठी वर्क फ्रॉम होम करत होता. हर्षिलला त्यासाठी मोठा पगारही दिला जायचा. हर्षिलचं आयुष्य रोजसारखं सुरू होते. परंतु एकेदिवशी त्याच्यावर मोठं संकट कोसळलं.3 / 10हर्षिलला अचानक कामावरून कमी करणार असल्याची बातमी मिळाली. त्यातच हर्षिलने त्याच्या स्टार्टअपवर काम करणे सुरू केले. नोकरी गेल्यानंतर हर्षिलला फटका बसला परंतु त्यातून न डगमगता हर्षिलने पुढील ६ महिन्यात असं काही करून दाखवले ज्याचा विचार कुणी केला नाही.4 / 10हर्षिल Dreamlaunch नावाच्या एका स्टार्टअप कंपनीचा को-फाऊंडर होता. त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून नोकरीवरून काढल्यापासून मिळालेल्या यशापर्यंत संपूर्ण प्रवास लोकांसोबत शेअर केला आहे. 5 / 10हर्षिलने सांगितले की, जवळपास ६ महिने आधी मला अमेरिकेतील एका कंपनीने रिमोट जॉबवरून काढले होते. १३ मार्चला सकाळी ७ वाजता मी मिटिंगमध्ये सहभागी झालो. माझ्या कामाबद्दल मी मिटिंगमध्ये अपडेट दिले. त्यावेळी कंपनीतील टीम लीडर काहीतरी कुजबुज करत होते. 6 / 10हर्षिलने त्याबाबत विचारले असता, टीम लीडर यांनी आता आपले रस्ते वेगळे करायला हवेत असं सांगितले. त्यामागचे कारण म्हणजे हर्षिल मागील काही दिवसांपासून त्याच्या स्टार्टअपवर जास्त फोकस करत होता. हर्षिलने कंपनीला मला आणखी एकदा संधी द्या असं म्हटलं परंतु कंपनीने त्याचे ऐकले नाही.7 / 10त्यावेळी हर्षिल ड्रीमलॉन्चमधून दर महिन्याला कसंबसं १ हजार डॉलर कमाई करत होता. इतक्या पैशात त्याचे घरही चालत नव्हते. पुढील १०-१५ दिवसांत हर्षिलने फार विचार केला. त्यानंतर हिंमतीने काम करत त्याच्या स्टार्टअपला पुढे घेऊन जाण्याचा निर्णय घेतला.8 / 10या काळात हर्षिलने फ्रिलान्सर काम करण्याचाही विचार केला, जेणेकरून बाकी खर्च पूर्ण होतील. मात्र ज्या कामासाठी माझी नोकरी गेली त्यावरच आपले सर्व काही लक्ष ठेवायचे असं हर्षिलने ठरवले. आज हर्षिल स्टार्टअप ड्रीमलॉन्चमधून दर महिना ५० हजार डॉलर म्हणजे ४३.५ लाख कमाई करतो.9 / 10विशेष म्हणजे हर्षिलच्या आई वडिलांना आजपर्यंत त्याची नोकरी गेलीय हे माहिती नाही. या कठीण काळात त्याच्या स्टार्टअपचा को फाऊंडर वसीमने त्याला साथ दिली. सुरुवातीला काही महिने ड्रीमलॉन्चकडे कुठलाही ग्राहक नव्हता. परंतु हर्षिल मागे हटला नाही आणि मजबुतीने काम करत राहिला. 10 / 10अखेर ड्रीमलॉन्चला स्पॉन्सरशिप, रेजिडेंसी कार्यक्रम मिळाले. मागील ६ महिन्यात ड्रीमलॉन्च दर महिना ५० हजार डॉलरचा रेवेन्यू पार करत आहे. आता हर्षिल २ लोकांची टीम वाढवून १० जणांची करत आहे. ड्रीमलॉन्च (Software as a Service) चं काम करते.