शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

रक्तदाब, शुगर, हृदयविकारासारख्या अनेक आजारात चॉकलेट ठरते फायदेशीर, जाणून घ्या हे पाच फायदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2021 14:14 IST

1 / 6
लहान मुलांना खूश करण्यासाठी, पार्टनरची नाराजी दूर करण्यासाठी चॉकलेट देण्याची पद्धत बऱ्याच काळापासून सुरू आहे. मात्र हेच डार्क चॉकलेट आरोग्यासाठीही तितकेच फायदेशीर असते हे तुम्हाला माहिती आहे का. दरवर्षी ७ जुलै रोजी जागतिक चॉकलेट डे साजरा केला जातो. त्यानिमित्ताने आज आपण जाणून घेऊयात चॉकलेटपासून शरीराला होणाऱ्या फायद्यांविषयी.
2 / 6
अभ्यासानुसार डार्क चॉकलेटमध्ये असलेलेल मॅग्नेशियम रक्तदाब कमी करण्यामध्ये फायदेशीर ठरते. २०२१ मध्ये ऑस्ट्रेलियात करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार जे लोक थोड्या थोड्या वेळाने डार्क चॉकलेट खातात त्यांचा रक्तदाब हा सामान्य राहतो.
3 / 6
कोलेस्टोरॉलच्या समस्येमध्येही डार्क चॉकलेट उपयुक्त ठरू शकते. अभ्यासानुसार डार्क चॉकलेटच्या सेवनामुळे बेड कोलेस्टेरॉल कमी होते. शरीरामध्ये बॅड कोलेस्टेरॉल वाढल्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते. मात्र डार्क चॉकलेट खाल्ल्यामुळे हा धोका कमी होतो.
4 / 6
२०१५ मध्ये झालेल्या एका अभ्यासातील अहवालानुसार डार्क चॉकलेट खाल्ल्यामुळे हृदय निरोगी राहते. यासंदर्भातील संशोधनाच्या अहवालानुसार डार्क चॉकलेटचे सेवन पांढऱ्या रक्त कोषिकांना ब्लड वेसेल्सला चिकटण्यापासून रोखतात. हार्ट जर्नलमध्ये प्रकाशित रिपोर्टनुसार दररोज डार्क चॉकलेट खाल्ल्याने हृदयाचे विकार आणि स्ट्रोकचा धोका कमी होतो.
5 / 6
संशोधकांच्या मते डार्क चॉकलेट खाल्ल्याने दीर्घकाळापर्यंत भूकेची जाणीव होत नाही. यामध्ये खूप प्रमाणात मोनो सेचुरेटेड फॅटी अॅसिड असते. ते मेटाबॉलिज्मला भक्कम बनवून फॅट बर्न करतात. एका अन्य संशोधनानुसार जेवणानंतर डेझर्ट म्हणून डार्क चॉकलेट खाल्ल्यास वजन नियंत्रणात राहते.
6 / 6
डार्क चॉकलेट खाल्ल्याने बुद्धी प्रखर होते. सन २०१२ मध्ये युनिव्हर्सिटी ऑफ नॉटिंगहॅमद्वारे करण्यात आलेल्या अध्ययनामध्ये सांगितले की, डार्क चॉकलेटच्या सेवनामुळे मेंदूमध्ये काही तासांसाठी रक्तपुरवठा वाढतो.त्यामुळे तुमच्या काम करण्याच्या आणि स्मृतीच्या क्षमतेमध्ये वाढ होते. सन २०१३ मध्ये न न्युरोलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित अध्ययनानुसार डार्क चॉकलेट खाल्ल्याने स्मृती ३० टक्क्यांनी वाढते.
टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यInternationalआंतरराष्ट्रीय