शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

हिवाळ्यात गरम पाण्याने आंघोळ करत असाल कर वेळीच व्हा सावध, पडू शकतं महागात

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2021 3:29 PM

1 / 10
हिवाळ्याला सुरूवात झाली आहे. हळूहळू थंडी वाढणार. हिवाळ्यात शरीराला आळस येतो. आळस घालवण्यासाठी आणि थंडी लागू नये म्हणून बरेच लोक कडक गरम पाण्याने आंघोळ करतात. तसेच थंडीपासून वाचण्यासाठी लोक चहा, कॉफीचा आधार घेतात. पण या सर्व गोष्टींमुळे तुमच्या शरीराला नुकसान होऊ शकतं. आज आम्ही तुम्हाला अशा १० चुकांबाबत सांगणार आहोत ज्या टाळल्या पाहिजेत.
2 / 10
हिवाळ्यात जास्तीत जास्त लोक गरम पाण्यानेच आंघोळ करतात. पण काही रिसर्च सांगतात की, या पाण्याचं तापमान ३२ डिग्री सेल्सिअसपर्यंतच असावं. जर त्यापेक्षा जास्त गरम पाण्याने आंघोळ केली तर त्वचा आणि केसांचं नुकसान होऊ शकतं. याने स्कीन इन्फेक्शनचाही धोका वाढतो. गरम पाण्यामुळे स्कीन टिशूजला नुकसान पोहोचतं. त्यामुळे कमी वयातच त्वचेवर सुरकुत्या दिसू लागतात.
3 / 10
जास्त कपडे घालणे - हिवाळ्यात शरीर गरम ठेवण्यासाठी जास्तीत जास्त लोक गरम कपडे घालतात. इतकंच नाही तर काही लोक तर एकावर एक अनेक कपडे घालतात. असं केल्याने त्यांचं शरीर ओवर हीट होऊ शकतं. थंडी लागल्यावर मनुष्याचं इम्यून सिस्टीम व्हाइट ब्लड सेल्स प्रोड्यूस करतं. ज्याने शरीर इन्फेक्शन आणि आजारांपासून सेफ राहतं. पण बॉडी ओवरहीट झाल्यावर इम्यून सिस्टीम ठीकपणे काम करू शकत नाही.
4 / 10
हिवाळ्यात लोक जास्त चहा आणि कॉफी पिणं सुरू करतात. पण असं करणं तुमच्या शरीरासाठी नुकसानकारक ठरू शकतं. चहा आणि कॉफीमध्ये कॅफीन असतं. ज्याचं जास्त प्रमाण शरीराला नुकसान पोहोचवतं.
5 / 10
हिवाळा सुरू होताच लोक कमी पाणी पितात. असं करणं शरीरासाठी चांगलं ठरणार नाही. हिवाळ्यात तहान कमी लागते याचा अर्थ शरीराला पाणी नको असं नाही. शरीराल पुरेसं पाणी न मिळाल्याने शरीर डीहायड्रेट होऊ लागते. असं झालं तर तुम्हाला किडनी आणि डायजेशनची समस्या होऊ शकते.
6 / 10
तुम्हाला जाणवलं असेल की, लोक थंडीच्या दिवसात जास्त खाणं सुरू करतात. याचं कारण आहे थंडीच्या दिवसात शरीरातील कॅलरी जास्त खर्च होणे. यामुळे आपण प्रमाणापेक्षा जास्त खाणं सुरू करतो. पण असं करणं आरोग्यासाठी नुकसानकारक आहे.
7 / 10
हिवाळ्यात तुम्हाला आरोग्यासोबतच त्वचेचीही काळजी घ्यावी लागते. कोरड्या त्वचेपासून वाचवण्यासाठी जर तुम्ही पुन्हा पुन्हा त्वचेवर तेल किंवा क्रीम लावत असाल. तर त्याने धूळ, माती आणि कीटाणू तुमच्या त्वचेवर चिकटतील. याने तुमच्या त्वचेचं नुकसानच होईल.
8 / 10
हिवाळा आपल्याला आवडतो कारण जसे आपण पांघरूण घेतो आपल्याला झोप लागते. हेच कारण आहे की, सकाळीही तुम्ही उशीरा उठता. दुपारी झोप घेतल्याने आपल्याला रिफ्रेश नक्कीच वाटतं. पण अनेकदा जास्त वेळ झोपल्याने आपल्या जागण्या-झोपण्याचा क्रम बदलतो. असं केल्याने हिवाळा संपल्यावर आपल्या शरीराला नॉर्मल मोडमध्ये येण्यासाठी बराच वेळ लागतो.
9 / 10
जर तुम्हीही हिवाळ्यात सर्दी-खोकल्यापासून वाचण्यासाठी नेहमी औषधांचा आधार घेत असाल तर तुम्हाला हे महागात पडू शकतं. औषधांचं अधिक सेवन केल्याने तुमचं इम्यून सिस्टीम कमजोर होते. तुमच्या शरीराला वेगवेगळ्या वातावरणातील आजारांसोबत लढण्यासाठी आणि इम्यून सिस्टीम मजबूत करण्यासाठी औषधांचं जास्त सेवन टाळावं लागेल.
10 / 10
हिवाळ्याच्या दिवसात अनेक लोक कपडे घरातच सुकवतात. पण जे कपडे तुम्ही घरात सुकवता त्यांच्यातून अनेक प्रकारचे ऑर्गेनिक कंपांउंड निघतात. ज्यामुळे वयोवृद्धांमध्ये आणि लहान मुलांमध्ये श्वासाची समस्या वाढू शकते. जर तुम्हाला कपडे घरातच सुकवायचे असतील तर कमीत कमी खिडक्या उघड्या ठेवा.
टॅग्स :Winter Care Tipsथंडीत त्वचेची काळजीHealth Tipsहेल्थ टिप्स