डिजिटल गोंधळात मन शांत ठेवा! एकाग्रता वाढवण्यासाठी हे ५ उपाय नक्की करून बघा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 14:01 IST
1 / 5मनाचं रक्षण करणं म्हणजे अधिकाधिक कामं करणं नाही, तर जे मन थकवतात ते कमी करणं आणि जे तुम्हाला एकाग्रता, शांतता आणि ऊर्जा देतात ते वाढवणं होय. मन उत्साही ठेवण्यासाठी हे ५ उपाय तुमच्या मदतीला येऊ शकतात.2 / 5डिजिटल सीमा आखा : आज सतत वाजणारी मोबाइल नोटिफिकेशन्स, ई-मेल्स आणि मेसेजेस. प्रत्येक नोटिफिकेशन बघणं म्हणजे तुमची ऊर्जा हळूहळू संपवणं. (उपाय - दिवसात ठराविक वेळ 'नो-स्क्रीन' म्हणून ठेवा. उदाहरणार्थ - सकाळी उठल्यावर १ तास आणि झोपण्याआधी १ तास मोबाइलपासून दूर राहा)3 / 5विचार लिहून ठेवा : आपल्या मनात रोज अनेक विचार, चिंता आणि कल्पना येतात. ते मनातच ठेवल्यास गोंधळ वाढतो. न लिहिलेले विचार मनावर भार बनून राहतात. (उपाय -डायरीत किंवा नोटबुकमध्ये चिंता, कल्पना आणि कामांच्या नोंदी करा. एकदा लिहून ठेवलं की ते मनातून उतरून कागदावर जातं. त्यामुळे मन हलकं होतं)4 / 5छोट्या ध्यानसाधना : ध्यान म्हणजे तासभर बसणं नाही. फक्त २-५ मिनिटांचा श्वासावर लक्ष केंद्रित करणारा थांबा सुद्धा तुमचं मन ताजं करू शकतो. (उपाय-कामाच्या मधे डोळे मिटून ५ खोल श्वास घ्या, किंवा एखादं लहानसं रिलॅक्सेशन अॅप वापरा. हे छोटं ब्रेक्स तुमचा ताण कमी करतात.)5 / 5कामांचं प्राधान्य ठरवा : एकाचवेळी सगळं करण्याचा प्रयत्न केला तर थकवा आणि निराशा येते. मनाला स्पष्ट दिशा नसेल तर ऊर्जा वाया जाते. (उपाय-दिवसाच्या सुरुवातीला फक्त १-२ महत्त्वाच्या गोष्टी निवडा आणि त्या पूर्ण करा. बाकीचं दुय्यम काम नंतर करा.)