शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

टॉयलेट एस्केपिझम: तुम्ही पण असंच करत आहात का? वेळीच व्हा सावध

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 15:42 IST

1 / 7
टॉयलेट एस्केपिझम- ही संकल्पना ओळखीची वाटते? - नाही? थांबा... काही लोक सकाळी उठल्यावर आपला स्मार्टफोन किंवा टॅब घेऊन बाथरुममध्ये जातात. टॉयलेट सीट ही तासन्‌तास फोन किंवा टॅब स्क्रोल करत बसण्यासाठीची त्यांची अतिशय आवडीची जागा असते.
2 / 7
हे काहीतरी ओळखीचं वाटतंय? तुमची रोजची सकाळ ही अशी सुरू होते आहे? मग तुम्ही 'टॉयलेट एस्केपिझम'ला शरण गेला आहात किंवा त्याच्या अधीन झाला आहात. याचा तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याच्या आत तुम्हाला ही सवय सोडणं भाग आहे. हा रेड अलर्ट समजा!
3 / 7
टॉयलेट एस्केपिझम ही संकल्पना तशी नवीन नाही. बाहेरच्या कटकटी, कोलाहल, माणसं यांच्यापासून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी स्वच्छतागृहाचा आधार घेणं हे अनेक लोक करत आले आहेत.
4 / 7
वर्तमानपत्र घेऊन 'आत' जाणारे लोक पूर्वी होते, आजही असतातच. पण आता त्याला मोबाईल किंवा टॅबची आणि स्क्रोलिंगची जोड मिळाली आहे.
5 / 7
हे फक्त भारतातच घडतं असं नाही तर जगात सगळीकडेच घडतं. स्मार्टफोन किंवा टॅबशिवाय जे लोक जेमतेम सात ते आठ मिनिटं टॉयलेट वापरतात तेच स्मार्टफोन किंवा टॅब हातात असेल तर अर्धा अर्धा तास, कधी कधी त्याहून अधिक वेळही टॉयलेटमध्ये बसून राहतात.
6 / 7
टीनएजर मुलांना आपला स्वतःचा स्मार्टफोन मिळाला की ती टॉयलेटमध्ये बसून राहण्याचा वेळ वाढतो, असं निरीक्षण डॉक्टर नोंदवतात. शिवाय, स्वच्छतागृह दिसायला कितीही स्वच्छ असलं तरी शेवटी ते स्वच्छतागृहच आहे.
7 / 7
तिथे हजारो, लाखो जीवजंतू असतात, हे मान्य करा आणि तिथे तुमचा मोबाईल किंवा टॅब घेऊन तासन्तास बसून राहणं योग्य की अयोग्य हे ठरवा, असं आता जगभरातले तज्ज्ञ डॉक्टर्स सांगू लागले आहेत.
टॅग्स :MobileमोबाइलHealthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सdoctorडॉक्टर