दररोज 'ॐ'चा उच्चार करून मानसिक आणि शारीरिक आरोग्य जपा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2019 13:12 IST
1 / 11हिंदू धर्मामध्ये ओम (ॐ) या शब्दाला फार महत्व असून हा शब्द फार पवित्र मानण्यात येतो. कोणत्याही पुजेदरम्यान मंत्रोच्चाराची सुरूवात याच शब्दा होते. पण तुम्हाला माहीत आहे का? जसं एखाद्या पूजेला सुरूवात करताना किंवा होमहवन करताना ओमचं उच्चारण करण्यात येतं. तसचं या मंत्राचा जप केल्याने मानसिक आणि शारीरिक आरोग्य उत्तम राखण्यासही मदत होते. ओम (ॐ)च्या उच्चाराने उत्पन्न होणारे तरंग डोकं शांत ठेवण्यासोबतच मन प्रसन्न ठेवण्यासह मदत करते. संशोधकांनी संशोधनातून सिद्ध केल्यानुसार, ओम शब्दाचा उच्चार केल्याने अनेक आजार ठिक होतात. 2 / 11ओम शब्दाचा उच्चार केल्यामुळे गळ्यामध्ये वायब्रेशन तयार होतात. ज्यामुळे थाइरॉयड प्रॉब्लेम्सपासून सुटका केली जाऊ शकते. 3 / 11ओमचा उच्चार केल्यामुळे अस्वस्थता आणि सतत वाटणारी भिती नाहिशी होते. 4 / 11ओमच्या मंत्राचा जप केल्याने मानसिक आरोग्य उत्तम राहण्यासोबतच तणाव आणि चिंता दूर होण्यासही मदत होते. 5 / 11ओम शब्दाचा जप केल्याने शरीरामधील ब्लड सर्कुलेशन उत्तम होतं. तसेच रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढण्यासाठी मदत होते. 6 / 11दररोज ओम शब्दाचा जप केल्यामुळे फुफ्फुसं, ब्लड प्रेशर आणि ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव होतं. तसेच हृदयाचे आरोग्य उत्तम राखण्यासाठीही मदत होते. 7 / 11ओम शब्दाचा उच्चार केल्याने पोटामध्ये तरंग तयार होतात. त्यामुळे पचनक्रिया सुरळीत होण्यास मदत होते. 8 / 11ओम शब्दाचा उच्चार केल्याने जास्त ऑक्सिजन मिळतो. तसेच ब्लड सर्क्युलेशन उत्तम होण्यास मदत होते. त्यामुळे एनर्जी लेव्हल वाढते. 9 / 11ओम शब्दाचा जप केल्याने थकवा दूर होतो आणि तुम्ही स्वतःला फ्रेश ठेवता.10 / 11झोपण्यापूर्वी ओम शब्दाचा उच्चार केल्याने झोपेच्या सर्व समस्या दूर होतात. त्यामुळे झोप चांगली येते आणि आरोग्य उत्तम राहते. 11 / 11ओम शब्दाचा जप केल्याने स्पायनल कॉर्डमद्ये वायब्रेशन होतात. तसेच त्यामुळे मणक्याचं आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते.