By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2021 14:38 IST
1 / 9मायग्रेनमध्ये डोक्याच्या एका बाजूला दुखत असतं. हे दुखणं अनेकदा सहस्य असतं. मायग्रेनचं दुखणं हे केवळ डोक्यापर्यंत सीमित राहत नाही. ४ ते ७२ तासांच्या दरम्यान हे दुखणं शरीराच्या इतरही काही भागात जाणवू लागतं. यामुळे काही लोकांना मळमळ किंवा उलटीही होऊ लागते. काही लोकांना मायग्रेनची समस्या झाल्यावर आवाज किंवा लख्ख प्रकाशानेही समस्या होते.2 / 9पुरूषांच्या तुलनेत महिलांमध्ये मायग्रेनची समस्या जास्त होते. अमेरिकेत करण्यात आलेल्या एका सर्व्हेनुसार, मायग्रेनच्या ६९ टक्के लोकांमध्ये डोक्यासोबतच मानेतही असह्य वेदना होतात. एका रिसर्चमध्ये आढळून आलं आहे की, मानेत वेदना होणं हेही एक मायग्रेनचं लक्षण असू शकतं.3 / 9मायग्रेनमुळे मान दुखण्याची वेगवेगळी कारणे असतात. यातील एक कारण हे आहे की, मायग्रेन ट्रायजेमिनोसर्विकल कॉम्प्लेक्सवर प्रभाव पाडतो. हा मेंदूचा तो भाग असतो ज्यात तंत्रिका चेहरा आणि मानेशी जुळलेल्या असतात.4 / 9काही इतर वैज्ञानिकांचं मत आहे की, मस्कुलोस्केटल समस्या जसे की, चुकीच्या पद्धतीने बसणे किंवा जॉइंटच्या समस्यामुळे मानेच्या वरच्या भागात तणाव जाणवतो. ज्यामुळे मायग्रेनच्या वेदना वाढतात.5 / 9मायग्रेनच्या रूग्णांनी असे काही पदार्थ खाणं टाळले पाहिजे ज्यांनी ही समस्या वाढते. जसे की, आंबट फळं, मद्य प्रोसेस्ड फूड आणि नायट्रेट्स असलेले पदार्थ. डाएटमध्ये मॅग्नेशिअम असलेले पदार्थ जास्त सामिल करा. डार्क सुगंध किंवा प्रकाशाने मायग्रेनचं दुखणं वाढू शकतं.6 / 9मायग्रेन आणि मानेचं दुखणं यांच्यातील संबंधाबाबत ठोस असं काही समोर आलं नाही. मात्र, मानेचं दुखणं दूर केलं तर मायग्रेनही दूर केला जाऊ शकतो.7 / 9मायग्रेनचं दुखणं कधीही वाढू देऊ नका. जर तुम्हाला मायग्रेनची समस्या राहत असेल तर डॉक्टरांना वेळीच संपर्क करा आणि योग्य ती औषधे घ्या. याकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं.8 / 9यावर काही घरगुती उपाय देखील आहेत. जसे की, वेदना होत असेल तेव्हा कानावर लॅवेंडर ऑइल लावा. लॅवेंडर ऑइलचा १५ मिनिटे सुगंध घेतला तर आराम मिळेल. एक्यूप्रेशर, एक्यूपंक्चर, सुंठाचा चहा, मसाज, योगा आणि स्ट्रेचिंगनेही मायग्रेन आणि मानेचं दुखणं कमी होतं.9 / 9यावर काही घरगुती उपाय देखील आहेत. जसे की, वेदना होत असेल तेव्हा कानावर लॅवेंडर ऑइल लावा. लॅवेंडर ऑइलचा १५ मिनिटे सुगंध घेतला तर आराम मिळेल. एक्यूप्रेशर, एक्यूपंक्चर, सुंठाचा चहा, मसाज, योगा आणि स्ट्रेचिंगनेही मायग्रेन आणि मानेचं दुखणं कमी होतं.