1 / 13कोरोना व्हायरसने पुन्हा एकदा गंभीर स्वरूप धारण केले आहे. देशातील एकूण रुग्णांच्या संख्येने चार कोटींचा टप्पा पार केला आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 18,930 नवीन रुग्ण आढळले असून 35 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 2 / 13केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार 4.32% च्या डेली पॉझिटिव्ह रेट सोबतच एकूण एक्टिव्ह प्रकरणांची संख्या वाढून 1,19,457 झाली आहे. याकडे कोरोनाची चौथी लाट म्हणून पाहिले जात आहे. 3 / 13आरोग्य मंत्रालयाने कोविड-19 लसीचा दुसरा डोस आणि बूस्टर डोसमधील अंतर नऊ महिन्यांवरून कमी करुन आता सहा महिने केले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. 4 / 13कोरोना व्हायरस झपाट्याने त्याचे स्वरूप बदलत आहे आणि प्रत्येक बदलत्या प्रकारामुळे कोरोनाची लक्षणेही झपाट्याने बदलत आहेत. आता फक्त ताप किंवा खोकला ही कोरोनाची लक्षणे राहिलेली नाहीत. 5 / 13कोरोनाचा शरीराच्या प्रत्येक अवयवावर परिणाम होत आहे. हा प्राणघातक व्हायरस शरीरात अनेक आठवडे किंवा महिने राहू शकतो. यामुळेच रुग्णांना बरे झाल्यानंतर काही महिने किंवा वर्षांनंतरही लाँग कोविड लक्षणांचा सामना करावा लागत आहे. अशाच लक्षणांबद्दल जाणून घेऊया...6 / 13कोविड टोजमध्ये पायाला आणि पायाच्या बोटांना विचित्र प्रकारे सूज आलेली दिसते. त्याची लक्षणे हात, मनगट आणि घोट्यासारख्या इतर भागात देखील दिसू शकतात. त्यामुळे बोटांच्या सूजेकडे दुर्लक्ष करू नका. 7 / 13या लक्षणांव्यतिरिक्त, आपण वास किंवा चव घेण्याची क्षमता कमी होणे, पोटाशी संबंधित समस्या, केस गळणे इत्यादी लक्षणांकडे देखील दुर्लक्ष करू नये कारण ही लक्षणे आपल्याला दीर्घकाळ त्रास देऊ शकतात.8 / 13संशोधकांना असे आढळून आले आहे की कोरोनामुळे रुग्णांमध्ये डोळ्यांशी संबंधित अनेक लक्षणे दिसून येत आहेत जसे की, प्रकाशाचा त्रास होणे, डोळे दुखणे, डोळ्यांत पाणी येणे आणि डोळे गुलाबी, लालसर होणे.9 / 13कोरोनाच्या दीर्घकाळ टिकणाऱ्या लक्षणांमध्ये त्वचेवर पुरळ उठणे किंवा रॅशेज येणे देखील समाविष्ट आहे. कोरोनामधून बरे झाल्यानंतर काही आठवड्यांनंतर रुग्णांनी अंगावर उठणा-या पित्ताच्या गाठी आणि त्वचेचा रंग बदल्याची लक्षणे दिसून आल्याचं सांगितलं.10 / 13त्वचेवरील रॅशेज अनेकदा शरीराच्या इतर भागांना संक्रमित करतात आणि उपचार न केल्यास ते आसपासच्या इतर लोकांना देखील प्रभावित करू शकतात. त्यामुळे असं आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. 11 / 13कोरोनाचा हृदयावर सर्वाधिक परिणाम होतो. ऑक्सिजनची कमतरता आणि हृदयाची सूज यासारख्या अनेक कारणांमुळे हृदयावर कोरोनाचा दीर्घकाळ परिणाम होऊ शकतो. हे प्रामुख्याने कोरोना रुग्णांमध्ये दिसून येते. 12 / 13रुग्णांचे हृदयाचे ठोके अनियमित होऊ शकतात. ही समस्या काहीच दिवसांत आपोआप बरी होईल या गैरसमजात चुकूनही राहू नका. लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि वेळीच उपचार करा. 13 / 13कोरोनानंतर अनेक रुग्णांमध्ये छातीत दुखण्याचे लक्षण दिसून आले आहे. अनेकांना कोरोना रुग्णांमध्ये रिकव्हरी अवस्थेपासून ते काही महिन्यांपर्यंत छातीत दुखण्याची समस्या जाणवली. इतर अनेकांमध्ये संसर्ग काही आठवड्यांनंतर सुरू होतो. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.