थंडी सुरु झाली...! रात्री झोपण्यापूर्वी बेंबीमध्ये या तेलाचे दोन थेंब टाका, मिळतील ७ आरोग्यदायी फायदे...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 21:16 IST
1 / 10थंडीचा मोसम सुरू होताच त्वचा कोरडी पडणे, सांधेदुखी आणि पचनक्रियेच्या तक्रारी वाढतात. या समस्यांवर मात करण्यासाठी आयुर्वेदामध्ये सांगितलेला एक सोपा आणि प्रभावी उपाय म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी बेंबी मध्ये तेल लावणे. विशेषतः मोहरीचे तेल बेंबी मध्ये लावल्यास त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात.2 / 10मोहरीचे तेल नैसर्गिकरित्या उष्ण असते. त्यामुळे बेंबीमध्ये हे तेल लावल्यास संपूर्ण शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो आणि शरीर उबदार राहते. 3 / 10शरीरात ऊब टिकवून ठेवते: मोहरीचे तेल गरम असल्याने शरीराचे अंतर्गत तापमान नियंत्रित राहते आणि थंडीपासून बचाव होतो.4 / 10त्वचेचा कोरडेपणा कमी होतो: हे तेल त्वचेला आतून पोषण आणि ओलावा देते, ज्यामुळे हिवाळ्यात त्वचा मऊ आणि चमकदार राहते.5 / 10बेंबीचा संबंध थेट आतड्यांशी असल्याने, तेलाची मालिश पचनक्रिया मजबूत करते आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होण्यास मदत होते.6 / 10मोहरीच्या तेलात दाहक-विरोधी गुणधर्म असतात. हे गुणधर्म सांधेदुखी आणि सूज कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात.7 / 10या तेलातील व्हिटॅमिन-ई, अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी-बॅक्टेरियल घटक शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवतात.8 / 10रात्री बेंबीवर तेल लावल्यास मज्जासंस्थेला आराम मिळतो आणि शांत व चांगली झोप लागते.9 / 10तेलातील अँटी-बॅक्टेरियल गुणधर्मांमुळे त्वचेवरील संसर्ग, खाज आणि पुरळ यांसारख्या समस्यांपासून बचाव होतो.10 / 10दररोज रात्री झोपण्यापूर्वी शुद्ध मोहरीचे तेल घेऊन त्याचे २ ते ३ थेंब बेंबी मध्ये टाका आणि हलक्या हाताने गोलाकार दिशेने २ ते ३ मिनिटे मालिश करा.