एका दिवसात 1 हजार कॅलरी बर्न करण्याचे खास उपाय, लगेच कमी होईल वजन
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2023 13:47 IST
1 / 10वजन कमी करण्यासाठी आधी तुम्हाला शरीरातील जास्तीच्या कॅलरी बर्न कराव्या लागतात. त्याशिवाय तुम्ही वजन कमी करू शकत नाही हे तर तुम्हाला माहीत असेलच. पण या कॅलरी बर्न कशा करायच्या आणि किती करायच्या हे अनेकांना माहीत नसतं. अशात आज आम्ही तुम्हाला हे सांगणार आहोत की, एका दिवसात तुम्ही 1 हजार कॅलरी बर्न करू शकता. चला जाणून घेऊ त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल. 2 / 101) 1 तास 20 मिनिटे माउंटेन बायकिंग - माउंटेन बायकिंग तुमच्या मांसपेशींना खूप आराम देते. याने तुमच्या पूर्ण शरीराची एक्सरसाइज होते. ही पद्धत जिममध्ये केल्या जाणाऱ्या हेवी एक्सरसाइजसारखी पद्धत आहे. ज्याद्वारे तुम्ही जास्तीत जास्त कॅलरी बर्न करू शकता.3 / 102) 1 तास पायी चला - वजन कमी करण्यासाठी आणि कॅलरी बर्न करण्यासाठी जास्तीत जास्त एक्सपर्ट तुम्हाला पायी चालण्याचा सल्ला देतात. रोज निदान तुम्ही 1 तास तरी पायी चालायला हवं. तेव्हा तुम्ही एक हजार कॅलरी बर्न करू शकता. तसेच याने तुमच्या हृदयाचं आरोग्यही चांगलं राहतं.4 / 103) एक तास फुटबॉल खेळा - फुटबॉल माइंड आणि स्पीडचा खेळ आहे. हा खेळ खेळण्यासाठी तुमच्याकडे जबरदस्त एनर्जी हवी. ज्याद्वारे तुमच्या कॅलरी बर्न होतात. जिममध्ये एक्सरसाइजपेक्षा या खेळाने तुमच्या अधिक कॅलरी बर्न होतात.5 / 104) 1 तास 30 मिनिटे बास्केटबॉल - बास्केटबॉल खेळ खेळताना केलेली रनिंग तुमच्या आरोग्यासाठी खूप चांगली असते. याने तुमच्या मसल्स तर बिल्ड होतातच सोबतच तुमच्या कॅलरी अधिक बर्न होतात.6 / 105) 1 तास हॉकी - हॉकी खेळाडूंचे शरीर क्रिकेट खेळणाऱ्यांच्या तुलनेत अधिक मजबूत असतात. कारण यात तुम्हाला जास्त धावण्यासोबतच बॉलही लोटत न्यायचा असतो. याने तुमच्या मसल्स मजबूत होतात आणि कॅलरी सुद्धा बर्न होतात.7 / 106) रोप जम्पिंग - रोप जम्पिंग हे रनिंगसारखंच आहे. ही एक अशी एक्सरसाइज आहे ज्याने पूर्ण शरीरावप प्रभाव पडतो. या एक्सरसाइजच्या माध्यमातून तुम्हाला एका तासात 750 ते 1047 कॅलरी बर्न करण्यास मदत मिळते. ही एक्सरसाइज करताना ही काळजी घ्या की, ही एक्सरसाइज हळूहळू करु नये आणि काही वेळाने ब्रेक घेत रहावा.8 / 107) कमी खा आणि बर्निंग वाढवा - जर तुम्ही जिममध्ये जाऊन एक्सरसाइज करत नाहीत, तर तुम्ही रोज कमीत कमी रोज 30 मिनिटं पार्कमध्ये जाऊन फिजिकल अॅक्टिविटी करावी. ज्याने तुमच्या कॅलरी बर्निंगमध्ये बॅलन्स राहील. तुम्हाला कॅलरीचं सेवन तर कमी करायचं आहेच, पण सोबतच बर्नही करायच्या आहेत.9 / 108) 1 तास स्वीमिंग - स्वीमिंग ही कॅलरी बर्न करण्याची सगळ्यात चांगली पद्धत मानली जाते. कारण स्वीमिंग ही एक संपूर्ण एक्सरसाइज मानली जाते. स्वीमिंगच्या वेगवेगळ्या पद्धतींच्या माध्यमातून तुम्ही जास्तीत जास्त कॅलरी बर्न करू शकता.10 / 109) डान्स - डान्स केल्यानेही तुम्हाला कॅलरी बर्न करण्यासाठी खूप जास्त फायदा मिळतो. कारण यावेळी जेवढा जास्त घाम जातो तेवढ्या जास्त कॅलरी बर्न होतात. अशात रोज निदान एक तास जर डान्स केला तर तुम्हाला खूप फायदा मिळेल.