शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

तुम्हीसुद्धा मधाच्या नावाखाली चायनीज शुगर सिरप विकत घेताय का? फसवणूक होण्याआधीच जाणून घ्या सत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2020 11:57 AM

1 / 10
मधात अनेक एंटी इंफ्लेमेटरी गुण असतात. ज्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती चांगली होण्यास मदत होते. म्हणूनच घराघरातील लोक फ्लू किंवा व्हायरल इन्फेक्शनपासून बचावासाठी आहारात मधाचा समावेश करत आहेत. मधाचे हे फायदे लक्षात घेता मधाची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. पण ज्या मधाला तुम्ही गुणकारी समजत आहात तेच मध शरीरासाठी हानीकारक ठरू शकतं. असा धक्कादायक खुलासा सेंटर फॉर सायंस एंड एन्वारमेंटकडून करण्यात आला आहे.
2 / 10
मध तयार करणाऱ्या सर्वाधिक कंपन्या मधामध्ये साखर मिसळत असल्याची माहिती या तपासातून मिळत आहे. सीएसईने 13 छोट्या मोठ्या कंपन्यांच्या मधाचे नमूने तपासले. या कंपन्यांच्या मधात 77 टक्क्यांपर्यंत भेसळ असल्याचं दिसून आलं. मधाचे एकूण 22 सँपल्सपैकी फक्त पाच सँपल्स चाचणीत यशस्वी ठरले आहेत.
3 / 10
सेंटर फॉर सायन्स अँड एनवायरमेंटनं (CSE) केलेल्या तपासातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे. सीएसईच्या महासंचालक सुनीता नारायण यांनी सांगितले की. '2003 आणि 2006 मध्ये सॉफ्ट ड्रिंकच्या केलेल्या तपासणीत त्यात जी भेसळ दिसून आली त्यापेक्षा भयानक भेसळ ही मधात केली जात आहे. ही भेसळ आपल्या शरीराला अपायकारक आहे. ज्या 13 मोठ्या कंपन्यांच्या मधाचे नमूने तपासले गेले त्यापैकी 10 एनएमआर चाचणीत अयोग्य ठरले. या 10 पैकी 3 नमूने भारतीय मापदंडानुसारही नव्हते'
4 / 10
विशेष म्हणजे CSE ने आपली तपासणी गुजरातच्या एका प्रयोगशाळेपासून सुरू केली होती. यात काही बँण्डस् सोडून सगळ्याच ब्रँण्डची तपासणी केली जात होती. काही कंपन्यांच्या मधात साखर असल्याचे दिसून आले होते. न्यूक्लियर रेजोनेंस स्पेक्ट्रोस्कोपी (NMR) टेस्टद्वारे या मधाचे परिक्षण करण्यात आले होते. फक्त तीन कंपन्यांच्या मधात कोणत्याही प्रकारचे शुगर सिरप नव्हते
5 / 10
2019 मध्ये सीएसईने आपल्या अहवालात म्हटले होते की एफएसएसएएआयने अनेक राज्यांच्या खाद्य आयुक्तांना सांगितले होते की साखर सिरप मधात मिसळून विकली जात आहे. मे महिन्यात, एफएसएसएएआयने 'गोल्डन सिरप', 'राईस सिरप' आणि 'इन्व्हर्टेड सिरप' च्या आयातदारांना नोंदणी करून त्यांच्या वापराविषयी माहिती देण्यास सांगितले होते. सीएसईने केलेल्या तपासणीत असे आढळले की गोल्डन सिरप आणि राईस सिरप केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाच्या आयात वस्तूंच्या यादीत नाहीत.
6 / 10
शुगर सिरप म्हणजे काय: साखर आणि पाणी विरघळवून बनविलं जाते, जे सामान्यत: कॉकटेल किंवा पेयमध्ये गोड पदार्थ म्हणून वापरले जाते. ते गरम पाण्यात साखर घालून तयार केले जाते आणि थंड झाल्यावर वापरले जाते. सामान्य साखरेच्या पाकात साखरेचे व पाण्याचे प्रमाण 1: 1 ठेवले जाते परंतु पाण्यातील साखरेचे प्रमाण आणखी जास्त असते. सीईएस म्हणतो की काही चीनी वेबसाइट्स फ्रुक्टोज सिरपच्या नावावर मध विकत आहेत.
7 / 10
डाउन टू अर्थच्या वृत्तानुसार, खेड्यांमध्ये मधमाश्या पाळण्याचा व्यवसाय करणारे काही लोक म्हणाले की, चिनी कंपन्यांनी उत्तराखंडमधील जसपूर, उत्तर प्रदेशमधील बिजनौर आणि पंजाबमधील बटाला येथे शुगर सिरप बनविण्यासाठी कारखानेही सुरू केले आहेत. ते असं शुगर सिरप तयार करत आहे जे सहजपणे कोणतीही चाचणीसाठी पास होऊ शकते. म्हणून मधाच्या व्यवसायात नुकसानाचा सामना करावा लागू शकतो.
8 / 10
मधच्या गुणवत्तेची तपासणी करण्याची प्रमाणं वेगवेगळी असतात. परंतु भेसळ करणारे लोक वेगवेगळे उपाय शोधून काढतात. भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानके प्राधिकरण (एफएसएसएएआय) यांनी गेल्या काही वर्षांत मधच्या गुणवत्तेच्या प्रमाणात दोनदा सुधारणा केली आहे.
9 / 10
डाउन टू अर्थ च्या वृत्तानुसार २०१७ मध्ये एफएसएसएएआयमध्ये प्रथमच मध, ऊस, तांदूळ किंवा मधातील बीटरुट यासारख्या पिकांपासून बनवलेल्या साखर शोधण्यासाठी तपासणी करण्यात आली होती. २ फेब्रुवारी २०२० रोजी निर्यात तपासणी परिषदेने (ईआयसी) सर्व मध निर्यातदारांसाठी एनएमआर चाचणी अनिवार्य केली. मधातील भेसळ पकडण्यासाठी आणि त्याची सत्यता तपासण्यासाठी हे पाऊल उचलले गेले. एनएमआर चाचणी ही मधासाठी सर्वात अचूक चाचणी मानली जाते.
10 / 10
सी 3 आणि सी 4 चाचणीमध्ये ज्यांना भेसळयुक्त मध मिळत नाही त्यांच्यासाठी एनएमआर चाचणी घेणे आवश्यक आहे. हेच कारण आहे की गेल्या काही वर्षांमध्ये, अधिक प्रभावी पद्धतीने या तपासणीचा अवलंब करण्याची मागणी केली जात आहे जेणेकरुन मधातील ही धोकादायक भेसळ थांबविली जाऊ शकेल.
टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यfoodअन्न