Health Tips: आयुष्यभराचा हेल्थ मंत्र लक्षात ठेवा; सूर्यास्ताआधी जेवा; तंदरुस्त राहा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2023 15:43 IST
1 / 4पहिले कारण : सूर्यास्ताआधी जेवल्याने पचनक्रिया नियंत्रित राहते. सेवन केलेले अन्न दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत व्यवस्थित पचते. या काळात अन्न पचायला पुरेसा वेळ मिळतो. याउलट उशिरा जेवल्याने आणि लगेच झोपल्याने अन्न पचत नाही आणि त्याचे रूपांत ऊर्जेत न होता मेद वृद्धीत होते.2 / 4दुसरे कारण : सूर्यास्ताआधी जेवल्याने अनेक प्रकारच्या रोगांपासून बचाव होतो. रात्रीचे जेवण उशिरा घेतल्यामुळे ते पचत नाही आणि विविध रोग शरीरात घर करतात. रात्री झोप पूर्ण होते. सकाळी वेळेत पोट साफ होते. दिवसभर थकवा जाणवत नाही.3 / 4तिसरे कारण : सूर्यास्तानंतर सूर्य प्रकाशाअभावी वातावरणात सूक्ष्म जिवाणूंचे साम्राज्य वाढते. ते जिवाणू अन्नात शिरकाव करतात आणि त्यामुळे अनेक व्याधी जडतात. वातावरणात आलेले जडत्त्व आपल्या शरीरालाही जाणवते, पण त्याकडे दुर्लक्ष करून आपण जेवतो आणि रोगांना आमंत्रण देतो.4 / 4चौथे कारण : सूर्यास्तानंतर प्रकृतीत अनेक बदल घडतात. पशु पक्षी देखील सूर्यास्ताआधी जेवून झोपी जातात. आपल्या शरीरावर निसर्गाचा प्रभाव पडत असतो. आपण प्रकृतीशी जेवढे जुळवून घेऊ, तेवढे निरोगी राहू. म्हणून ही दिनचर्या आत्मसात करणे सोयीस्कर ठरते.