Health Tips: मासिक पाळीच्या काळात कमी रक्तस्राव होण्यामागील कारणं जाणून घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2024 11:58 IST
1 / 6अतिविचारामुळे बायका तणाव ओढवून घेतात. तणावामुळे रक्तस्त्राव कमी होऊ शकतो. खरं तर, तणावामुळे शरीरात कोर्टिसोल हार्मोन वाढतो, ज्यामुळे हायपोथालेमस, पिट्यूटरी आणि स्वादुपिंडाच्या कार्यावर परिणाम होतो, ज्यामुळे रक्तस्त्राव कमी होऊ शकतो.2 / 6तरुण वयात मासिक पाळी आल्यानेही रक्तप्रवाह कमी होतो. या वयात हार्मोन्स कमी तयार होतात ज्यामुळे रक्तस्त्राव कमी होतो. कधीकधी मुलींना खूप कमी रक्तस्त्राव होतो किंवा जेमतेम डाग दिसतात.3 / 6PCOD आणि PCOS च्या समस्येमध्ये देखील हार्मोनल असंतुलनामुळे, मासिक पाळी दरम्यान रक्त प्रवाह कमी होतो. या स्थितीत, हार्मोन्स कमी तयार होतात ज्यामुळे रक्त प्रवाह कमी होतो.4 / 6तुमचे वय जास्त असल्यास आणि रजोनिवृत्तीपूर्वीच्या टप्प्यात असल्यास, तुमचा रक्तप्रवाह देखील कमी होऊ शकतो. याशिवाय तुमचे वजन कमी असेल आणि शरीरात चरबी कमी असेल तर मासिक पाळी देखील अनियमित होऊ शकते. अशा परिस्थितीत तुमचे हार्मोन्स सामान्यपणे कार्य करू शकत नाहीत.5 / 6तज्ज्ञांच्या मते, ज्या स्त्रिया खूप तीव्र वर्कआउट करतात त्या आवश्यकतेपेक्षा जास्त ऊर्जा वापरतात त्यांनाही मासिक पाळीच्या काळात कमी रक्तस्राव होण्याचा प्रश्न भेडसावू शकतो. 6 / 6जेव्हा थायरॉईड संप्रेरकांचे उत्पादन झपाट्याने वाढते तेव्हादेखील मासिक पाळीवर त्याचे परिणाम होतात आणि फ्लो कमी होतो.