1 / 9शरीराचे तापमान संतुलित राहावे यासाठी आपल्याला घाम येत असतो. घामामुळे शरीरातील हानिकारक घटक बाहेर पडतात. पण, घामामुळे आपल्या अंगाला दुर्गंधीदेखील येते. शिवाय घामामुळे कपडेही खराब होतात. घामातून दुर्गंधी येऊ लागल्याने आपल्याला चारचौघांत जाणे लाजिरवाणे वाटते. 2 / 9उन्हाळ्यामध्ये ही समस्या वाढते. हा त्रास दूर व्हावा म्हणून आपण कायम डिओड्रंट किंवा परफ्युमचा वापर करत असतो. पण याच्या अधिक वापरामुळे त्वचा खराब होण्याची अथवा इन्फेक्शन होण्याची शक्यता नाकारता येत नाही.3 / 9घामाला दुर्गंधी येण्याची अनेक कारणे आहेत. ज्यामध्ये औषधे, सप्लिमेंट्सचे सेवन केल्याने देखील घाम येऊ शकतो. घामाच्या वासासाठी मधुमेह, संधिवात, यकृत आजार, मूत्रपिंडाचा आजार, संसर्गजन्य रोग हे देखील कारणीभूत असतात.4 / 9मधुमेह असल्यास घामाच्या वासात बदल हे डायबेटिक केटोएसिडोसिसचे लक्षण असू शकते. उच्च किटोन पातळीमुळे रक्त आम्लयुक्त बनते. ज्यामुळे, घामाला फळांचा वास येतो.5 / 9यकृत किंवा किडनीच्या आजारात शरीरा विषारी पदार्थ जमा होतात. त्यामुळे, घामाला ब्लीचसारखा वास येतो.6 / 9चांगली स्वच्छता राखणे, दिवसातून दोनदा शरीर स्वच्छ करणे. श्वास घेता येईल असे सुती कपडे वापरणे. कांदा, लसूण आणि अल्कोहोल टाळणे. बॅक्टेरिया टाळण्यासाठी केस ट्रिम करावे. 7 / 9बेंझॉयल पेरोक्साइडसारख्या औषधांचा बॉडी वॉश अथवा साबण म्हणून वापर करावा. जास्त घाम असलेल्या भागात एल्युमिनियम क्लोराइडसारख्या अँटीपर्सपिरंट्सचा वापर करणे.8 / 9उन्हाळ्यात संतुलित आहार घेणे आवश्यक आहे. ताजी फळे आणि भाज्या खाव्यात. लसूण, कांदे, मसाल्याचे पदार्थ आणि अल्कोहोल यासारखे तीव्र वासाचे पदार्थ खाल्ल्याने दुर्गंधी येऊ शकते. 9 / 9दिवसभरात कमीतकमी तीन लिटर पाणी पिणे आवश्यक आहे असे त्वचारोग तज्ज्ञ डॉ. दीपक नाईक, यांनी सांगितले.