1 / 11कोथिंबिरीचा वापर वेगवेगळ्या पदार्थांमध्ये हमखास केला जातो. यामुळे अन्नाची चव तर वाढवतेच पण त्याचा सुगंधही रिफ्रेशिंग असतो. रोजच्या जेवणात वापरली जाणारी ही कोथिंबीर हृदयापासून ते मेंदूपर्यंत अत्यंत गुणकारी ठरते. 2 / 11हेल्थलाईनच्या माहितीनुसार, कोथिंबिरीच्या पानांमध्ये असे अनेक एन्झाइम्स आढळतात जे रक्तातील साखर कमी करण्यात मदत करतात. ज्यांना उच्च रक्तदाब किंवा टाइप 2 मधुमेहाची समस्या आहे, त्यांच्यासाठी ही एक अतिशय फायदेशीर औषधी वनस्पती आहे. 3 / 11मसालेदार चटणी बनवून रोजच्या जेवणाची चव वाढवू शकता. यासोबतच अनेक फायदे देखील आहेत. आहारात कोथिंबिरीचा समावेश केल्याने आरोग्य विषयक कोणत्या समस्या टाळता येतील ते जाणून घेऊया.4 / 11कोथिंबिरीच्या पानांमध्ये भरपूर फायबर आणि अँटीऑक्सिडंट असतात, जे पचनक्रिया चांगले ठेवण्यास मदत करतात. हिरवी कोथिंबीरी मेटाबॉलिझम वाढवण्यासाठी आणि सूज कमी करण्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे.5 / 11कोथिंबिरीच्या पानांमध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट तणाव कमी करण्यास मदत करतात. कोथिंबिरमुळे स्ट्रेसची समस्या कमी होऊ शकते, असे संशोधनात आढळून आले आहे. तसेच स्मरणशक्ती वाढवण्यासाठी देखील फायदा होतो.6 / 11कोथिंबिरीच्या पानामध्ये जीवनसत्त्वे आणि प्रथिने व्यतिरिक्त कॅल्शियम, लोह आणि मँगनीज मुबलक प्रमाणात आढळतात, ज्यामुळे रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते. 7 / 11कोथिंबिरीच्या नियमित सेवनाने हृदयाशी संबंधित समस्या आणि स्ट्रोकचा धोका कमी होतो. ते अत्यंत फायदेशीर असल्याचं समोर आलं आहे.8 / 11रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी कोथिंबीर खूप फायदेशीर आहे. कोथिंबीर खाल्ल्याने अनेक एंजाइम सक्रिय होतात, ज्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होण्यास मदत होते.9 / 11कोथिंबिरीच्या पानांमध्ये अँटी-मायक्रोबायल घटक आढळतात, जे पोटाच्या संसर्गापासून आणि संक्रमित अन्नामुळे होणाऱ्या रोगांपासून संरक्षण करण्यासाठी प्रभावी ठरतात. इतकंच नाही UTI पासून संरक्षण करण्यासाठी देखील खूप प्रभावी आहे.10 / 11कोथिंबिरीच्या पानामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात अँटी-ऑक्सिडेंट असतात की मेंदूची सूज, स्मरणशक्ती कमी होणे, चिंता इत्यादी समस्या देखील त्याच्या नियमित सेवनाने कमी होतात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.11 / 11टिप- ही माहिती आम्ही केवळ वाचक म्हणून आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची शारीरिक स्थिती वेगळी असल्यानं कोणताही उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.