'ही' लक्षणं सांगतात शरीरामध्ये आहे Folic Acid ची कमतरता
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2019 14:58 IST
1 / 7धावपळीच्या आयुष्यात आरोग्याची काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं असतं. आहारात पोषक घटकांचा समावेश असणं गरजेचं आहे. शरीरासाठी फोलिक अॅसिडची गरज असते. फोलिक अॅसिडला व्हिटॅमिन बी 9 असं देखील म्हटलं जातं. फोलिक अॅसिड हे फोलेटचं कृत्रिम रुप आहे. 2 / 7शरीरात फोलिक अॅसिडची कमतरता झाली तर अॅनीमिया, थकवा, अशक्तपणा जाणवतो. तसेच राग अनावर होतो. अशा समस्यांचा सामना करावा लागत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. 3 / 7फोलेट काही फळांमध्ये आणि भाज्यांमध्ये असतं. तर काही खाद्यपदार्थ तयार करताना फोलिक अॅसिड वापरलं जातं. व्हाईट पास्ता, प्रोटीन बार सारख्या अनेक पदार्थांमध्ये फोलिक अॅसिड असतं. 4 / 7फोलिक अॅसिड हे फोलेटचं कृत्रिम रुप आहे. फोलेटची कमतरता दूर करण्यासाठी फोलिक अॅसिडचा वापर केला जातो. पालेभाज्या, पपई, डायफ्रूट्समध्ये फोलेट असतं. 5 / 7मसूर डाळीमध्ये पोटॅशियमसोबतच फोलट देखील असतं. ब्लडप्रेशरचा त्रास असलेल्या लोकांनी आपल्या आहारात मसूर डाळीचा समावेश करावा. 6 / 7 गर्भवती महिलांसाठी फोलिक अॅसिड महत्त्वाचे असते. मात्र याआधी डॉक्टरांचा योग्य सल्ला घेणं गरजेचं आहे. 7 / 7(टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.)