शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Covishield घेतली असेल तर सावध रहा! नव्या साईड इफेक्टने वाढविल्या चिंता; WHO चा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2021 6:30 PM

1 / 10
WHO ने सोमवारी जॉन्सन अँड जॉन्सन आणि एस्ट्राझिनेका (AstraZeneca) सारख्या कंपन्यांच्या अॅडिनोव्हायरस व्हेक्टर कोरोना व्हॅक्सिनवर चिंता व्यक्त केली आहे. व्हॅक्सिन सेफ्टीवर बनविण्यात आलेल्या ग्लोबल अॅडव्हायजरी कमिटी (GACVS) ने 'गुलियन बैरे सिंड्रोम' (Guillain-Barré Syndrome) चा उल्लेख केला आहे. जीबीएस हा एक ऑटोइम्यून डिसऑर्डर आहे. शरीरातील नर्व्ह सिस्टीमला उद्ध्वस्त करतो. (Rare cases of GBS may occur after Janssen and AstraZeneca's Covishield vaccines: WHO panel)
2 / 10
WHO च्या ग्लोबल अॅडव्हायजरी कमिटीकडून देण्यात आलेल्या इशाऱ्यामध्ये म्हटले आहे की, जॉन्सन आणि एस्ट्राझिनेकाच्या कोरोना लसीमुळे इम्यून सिस्टिम डिसऑर्डरची समस्या होऊ शकते. हा आजार कमकुवत मांसपेशी, दुखणे, सुन्नपणा आणि पॅरालाईज सारखे विकार देऊ शकतो.
3 / 10
GACVS ने १३ जुलैला दोन्ही कंपन्यांच्या लसीचे दुष्परीणामांवरील अहवालावर एक व्हर्च्युअल कॉन्फरन्स केली होती. या दोन्ही लशी एडीनोव्हायरस प्लॅटफॉर्मला आपल्या मणक्यासारखा वापर करतात. Oxford-AstraZeneca ची कोरोनावरील लस भारतात कोव्हिशिल्ड नावाने उत्पादित केली जाते.
4 / 10
तज्ज्ञांनी सांगितले की, GBS इन्फेक्शनसह अन्य काही कारणांनी उद्भवू शकते. हा त्रास 50 वर्षांहून अधिक वय असलेल्या पुरुषांमध्ये जास्त दिसून येऊ शकतो. लसीकरणानंतर हे प्रकार आणि रुग्ण गुप्त रुपाने वाढू शकतात.
5 / 10
WHO नुसार युरोपियन मेडिसिन एजन्सीच्या फार्माकोव्हिजिलेंस रिस्क असेस्मेंट कमिटी (PRAC) ने 9 जुलै रोजी Vaxzevria (युरोपमधील कोव्हिशिल्डचे नाव) वर एक माहिती प्रसिद्ध केली होती. ही लस घेतल्यावर GBS वरून सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला होता. मात्र त्यांनी लसीमुळेच जीबीएस होईल किंवा नाही याबाबत स्पष्ट सांगितले नाही. म्हणजेच नाकारले देखील नाही.
6 / 10
रिपोर्ट नुसार, युरोपियन युनियनने 27 जून 2021 पर्यंत लसीकरणानंतर 227 जीबीएसचे रुग्ण मिळाल्याचे म्हटले आहे. येथे 20 जून 2021 पर्यंत Vaxzevria लसीने पाच कोटींहून अधिक लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे.
7 / 10
जॉन्सन अँड जॉन्सनची कोरोना लस Janssen वर अमेरिकेच्या फूड अँड ड्रग एडमिनिस्ट्रेशन (US FDA) ने 13 जुलैला फॅक्ट शीटमध्ये सुधारणा करण्याचे आदेश दिले होते. यामध्ये GBS चा धोका किती आहे आदी माहिती देण्यास सांगितले होते.
8 / 10
इम्यूनाइजेशन प्रॅक्टिस वर अमेरिकेच्या अॅडवाझरी कमिटी (ACIP) 22 जुलैला केलेल्या बैठकीत माहितीची समीक्षा केली होती. 30 जूनपर्यंत जीबीएसचे 100 रुग्ण सापडले होते. अमेरिकेत Janssen चे 1.20 कोटी लोकांना डोस देण्यात आले आहेत.
9 / 10
डब्ल्यूएचओने सर्व हेल्थकेअर प्रोफेशनलना जीबीएससह अन्य सर्व प्रकारच्या साईड इफेक्टवर नजर ठेवण्याचे आणि रिपोर्ट करण्याचे आदेश दिले आहेत. Janssen or AstraZeneca ज्या लोकांना लस दिली जात आहे, त्यांच्यात जीबीएस लक्षणांची ओळख पटविण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.
10 / 10
WHO नुसार अशा लोकांना चालण्यास त्रास होऊ शकतो. चेहऱ्यावरील प्रतिक्रियांमध्ये, हावभावात बदल होऊ शकतो. मूत्राशय किंवा आतड्यांना सूज येवू शकते. असे झाले तरी काळजी करण्याचे कारण नाही. कारण अधिकांश रुग्ण पूर्णपणे बरे होतात, असे तज्ज्ञांनी सांगितले.
टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या