1 / 8उच्च रक्तदाब म्हणजेच हाय ब्लड प्रेशर एक अशी समस्या आहे जी दिवसेंदिवस वाढत आहे. याने धमण्यांमध्ये रक्ताचा दबाव वाढतो. ज्यामुळे हृदयाला सामान्यापेक्षा अधिक प्रमाणात काम करावं लागतं. सामान्यपणे ही समस्या अधिक तळलेले, भाजलेले आणि चिकट पदार्थ खाल्ल्याने आणि शारीरिक श्रम न केल्याने होते. त्यामुळे अनेकजण ब्लड प्रेशन नियंत्रणात ठेवण्यासाठी धडपडत असतात. अशात असेही काही फळं आहेत ज्यांच्या मदतीने तुम्ही ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये ठेवू शकता. 2 / 8स्ट्रेस कमी करतो रताळं - रताळं म्हणजेच स्वीट पोटॅटोमध्ये बीटा कॅरोटीन, कॅल्शिअम आणि फायबर असतं. ज्याने स्ट्रेस कमी करण्यात मिळते. अर्थातच याने बीपी कंट्रोलमध्ये राहतो. 3 / 8पोटॅशिअमचा उत्तम स्त्रोत केळी - उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी पोटॅशिअम एक महत्त्वपूर्ण भूमिका निभावतं. केळी पोटॅशिअमचं सर्वात चांगला स्त्रोत आहे. 4 / 8रक्तदाब कंट्रोल करण्यासाठी स्ट्रॉबेरी - स्ट्रॉबेरीमध्ये भरपूर प्रमाणात अॅंटीऑक्सिडेट्स, व्हिटॅमिन सी आणि ओमेगा ३ फॅटी अॅसिड असतं. यातील पोटॅशिअममुळे उच्च रक्तदाब कंट्रोलमध्ये राहतो. 5 / 8आंबा - आंब्यामध्येही भरपूर प्रमाणात पोटॅशिअम असतं. त्यामुळे आंबा सुद्धा उच्च रक्तदाब कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी आदर्श फळ मानला जातो. 6 / 8कलिंगड - कलिंगडमध्ये पोटॅशिअम भरपूर प्रमाणात असतं. तसेच यात अॅंटीऑक्सिडेंट्स आणि व्हिटॅमिन सी सुद्धा भरपूर प्रमाणात असतं. 7 / 8किवी - किवी या फळामध्ये २ टक्के कॅल्शिअम, ७ टक्के मॅग्नेशिअम आणि ९ टक्के पोटॅशिअम असतं. बीपी कंट्रोल करण्यासाठी दिवसातून ३ किवी फळं खावीत. 8 / 8दह्याचं सेवन - या फळांसोबतच बीपी नियंत्रणात ठेवण्यासाठी दह्याचं सेवन करायला हवं. प्रोटीन, कॅल्शिअम, रायबोफ्लेविन, व्हिटॅमिन बी ६ आणि व्हिटॅमिन बी १२ भरपूर प्रमाणात असतं.