शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

केसरचे पाच महत्त्वाचे फायदे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2017 5:43 PM

1 / 5
केसर हे मिळण्यास अवघड आणि महागडा अशी गोष्ट आहे. अनेक सौंदर्यप्रसाधनं, औषधे आणि खाद्यपदार्थांमध्ये केसरचा उपयोग केला जातो.
2 / 5
आतापर्यंत जगभरातल्या अनेक अभ्यासक आणि संशोधकांनी केसरवर मोठा अभ्यास केला आणि त्यात असे सिध्द झाले आहे की केसरमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत.
3 / 5
केसरात असलेल्या काही गुणधर्मांमुळे आपली लैंगिक क्षमता सुधारते, असे सिध्द झाले आहे. त्यामुळे भारतीय परंपरेत रात्री झोपण्यापुर्वी केसरयुक्त दुध पिण्याची पध्दत आहे.
4 / 5
केसर हे सर्दी-खोकल्यावर अतिशय रामबाण औषध आहे. त्यामुळे सर्दी-खोकला झाल्यास केसर दुधात मिसळुन प्यायले जाते किंवा चिमुटभर केसर कपाळाला आणि छातीला लावले जाते.
5 / 5
केसरमध्ये निसर्गत:च अनेक औषधी गुणधर्म असल्याने त्यांचा वापर अनेक औषधे आणि सौंदर्यप्रसाधनांमध्ये केला जातो. या गुणधर्मांमुळे त्वचेचा, केसांचा पोत सुधारतो. साबण, शॅम्पु आणि तेलामध्ये केसरचा उपयोग केला जातो.
टॅग्स :Healthआरोग्यcancerकर्करोगmedicinesऔषधं