शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

आता वर्षातून फक्त दोन वेळा इंजेक्शन घेऊन 50% पर्यंत घटवता येणार कोलेस्टेरॉल, UK मध्ये झाली सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2021 5:18 PM

1 / 9
आता बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी वारंवार स्टॅटिन औषध घेण्याची आवश्यकता भासणार नाही. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी, आता इंजेक्शनच्या स्वरूपात औषध उपलब्ध करून देण्यात आले आहे. याला इक्लिसिरेन असे नाव देण्यात आले आहे. हे इंजेक्शन वर्षातून दोन वेळा घ्यावे लागेल. (England cholesterol drug new option reduce cases of heart disease)
2 / 9
इंग्लंडमधील आरोग्य संस्था NHS ने बुधवारी याची सुरुवात केली. या औषधाला तज्ज्ञ मंडळी 'गेम चेन्जिंग' उपचार म्हणत आहेत. या नव्या इंजेक्शनचा कितपत फायदा होईल, हे इंजेक्शन कोणत्या रुग्णांना मिळेल, भविष्यात याचा काय परिणाम होईल, जाणून घ्या…
3 / 9
सोप्या भाषेत सांगायचे तर, कोलेस्टेरॉल म्हणजे एक फॅटी चिकट पदार्थ असतो. तो हळू-हळू रक्तवाहिन्यांमध्ये जमा होतो. यामुळे हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक सारख्या समस्या आणि धमन्यांचे नुकसान होऊ शकते. याला वैज्ञानिक भाषेत एलडीएल कोलेस्टेरॉल असेही म्हणतात.
4 / 9
अहवालानुसार, रुग्णांना दर 6 महिन्याला हे इंजेक्शन घ्यावे लागेल. यामुळे त्यांची कोलेस्टेरॉलच्या औषधांपासून सुटका होईल. हे नवीन इंजेक्शन घेतल्यानंतर रुग्णांमधील कोलेस्टेरॉल 50 टक्क्यांपर्यंत कमी होईल.
5 / 9
आरोग्य सचिव साजिद जाविद यांनी यासंदर्भात सांगितले, की ही एक लाइफ सेव्हिंग ट्रिटमेंट आहे. जी हृदयरोग वाढण्यापासून रोखेल. हे औषध स्टॅटिन्सपेक्षा अधिक प्रभावी आहे. जे काही कारणांमुळे औषध घेऊ शकत नाहीत, त्यांनाही हे औषध दिले जाऊ शकते.
6 / 9
सर्वप्रथम 3 लाख रुग्णांना मिळणार इंजेक्शन - हे औषध PCSK9 नावाच्या प्रोटीनला ब्लॉक करून रक्तातील कोलेस्टेरॉल कमी करण्यात यकृताला मदत करते. PCSK9 प्रोटीनमुळेच शरीराचे अवयव कोलेस्टेरॉल काढून शकत नाहीत. हे नवे औषध याच प्रोटीनला ब्लॉक करते. जस-जशी शरिरातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी होईल, तस-तसा आजाराचा धोकाही कमी होऊ लागेल. नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ अँड केअर एक्सलन्सने सुरुवातीच्या टप्प्यात या इंजेक्शनसाठी केवळ 3 लाख रुग्णांनाच परवानगी दिली आहे.
7 / 9
ज्या यारुग्णांना या इंजेक्शनसाठी परवानगी देण्यात आली आहे, त्यांत ज्यांच्या शरिरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण खूप अधिक आहे, जे हृदयरोगाने त्रस्त आहेत अथवा जे हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोकने ग्रस्त आहेत. पुढील दशकात, 55,000 हृदयविकाराचे आणि स्ट्रोकची प्रकरणं रोखली जाऊ शकतात.
8 / 9
...म्हणून इंग्लंडमध्ये या औषधाची गरज पडली - इंग्लंडच्या सरकारी आकडेवारीनुसार, तेथे दर 5 पैकी दोन वयस्कांमध्ये कोलेस्टेरॉलचे प्रमाण अधिक आहे. हे हृदयरोगाचे एक मुख्य कारण आहे. यामुळे इंग्लंडमध्ये दर 4 पैकी एकाचा मृत्यू होतो. इंग्लंडमध्ये कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी जे लोक स्टॅटिन्स वापरतात, त्यांतील काहींना डोकेदुखीसारख्या दुष्परिणामांमधून जावे लागते.
9 / 9
पहिल्या 3 लाख रुग्णांना मिळणार इंजेक्शन - इंजेक्शनमध्ये वापरण्यात आलेल्या औषधावर रिसर्च करणारे इंपीरियल कॉलेज लंडनचे प्राध्यापक कौशिक रे म्हणाले, रुग्णांसाठी ही एक मोठी बातमी आहे. यामुळे त्यांच्या वरील औषधांचे ओझे कमी होईल. या एका इंजेक्शनची किंमत सुमारे 2 लाख रुपये एवढी आहे. हे इंजेक्शन वर्षातून दोन वेळा घ्यावे लागणार असल्याने, यासाठी रुग्णांना जवळपास 4 लाख रुपये वार्षिक खर्च येईल.
टॅग्स :Heart Attackहृदयविकाराचा झटकाEnglandइंग्लंडmedicineऔषधंdoctorडॉक्टर