शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Bubonic Plague: धक्कादायक! ‘Black Death’ महामारी पुन्हा पसरण्याची शक्यता; रशियन डॉक्टरचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2021 12:04 PM

1 / 11
कोरोनाशी लढणाऱ्या जगासाठी आणखी एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. रशियाच्या एका डॉक्टरने इशारा दिला आहे की, जर जगाने ग्लोबल वॉर्मिंग कमी केलं नाही तर जगात ब्यूबोनिक प्लेग (Bubonic Plague) धोका निर्माण होऊ शकतो. या आजाराने यापूर्वीही लाखो लोकांचा जीव घेतला आहे. आतापर्यंत ३ वेळा या आजाराने हल्ला केला आहे. पहिल्यांदा ५ कोटी, दुसऱ्यांदा युरोपाच्या एक तृतीयांश लोकसंख्या आणि तिसऱ्यांदा ८० हजार लोकांचा जीव घेतला आहे. या आजाराला ब्लॅथ डेथ(Black Death) म्हणजे काळा मृत्यू असंही म्हणतात
2 / 11
रशियाच्या डॉक्टर अन्ना पोपावा सांगतात की, ब्यूबोनिक प्लेग पुन्हा परतण्याची शक्यता आहे. कारण ग्लोबल वॉर्मिंगचा धोका वाढत चालला आहे. मागील काही वर्षापासून चीन, रशिया, अमेरिका याठिकाणी ब्लॅक डेथचे प्रकरण समोर आले. याचं भयानक रुप आफ्रिकेत पाहायला मिळू शकतं. कारण तेथे हा आजार पसरण्याची शक्यता आहे.
3 / 11
पर्यावरणात होणाऱ्या बदलामुळे जलवायू परिवर्तन होत आहे. जागतिक तापमान वाढीमुळे ब्यूबोनिक प्लेग पुन्हा डोकं वर काढण्याची शक्यता आहे. काळ्या मृत्यूचे अनेक प्रकरणं जगातील विविध भागातून समोर आले आहेत. याची संख्या सातत्याने वाढत आहे. कारण हा आजार पसरवणाऱ्या माशांची संख्या वाढत आहे.
4 / 11
ब्यूबोनिक प्लेग ज्या बॅक्टेरियामुळे होतो त्याचं नाव यर्सिनिया पेस्टिस बॅक्टीरियम आहे. हे जीवाणू शरीराच्या रक्त आणि फुफ्फुसांवर हल्ला करतात. यात बोटं काळी पडतात. नाकासोबत असेच होते. ब्यूबोनिक प्लेगला गिल्टीवाला प्लेग असंही म्हणतात. यात शरीरात असह्य वेदना, उच्च ताप. नाडी वेग वाढतो
5 / 11
दोन-तीन दिवसात पित्त बाहेर येऊ लागते. नंतर शरीरातील वेदना न संपणाऱ्या असतात. ब्यूबोनिक प्लेग सर्वात आधी जंगली उंदरांमध्ये आढळतो. उंदीरांच्या मृत्यूनंतर, या प्लेगचे जीवाणू पिसूद्वारे मानवी शरीरात प्रवेश करतात. यानंतर, जेव्हा पिसू माणसाला चावतो तेव्हा तो संसर्गजन्य द्रव मानवांच्या रक्तात सोडतो. यानंतरच त्या व्यक्तीला संसर्ग होऊ लागतो. उंदीर मरू लागल्यानंतर दोन ते तीन आठवड्यांत मानवांमध्ये प्लेग पसरतो
6 / 11
२०१० ते २०१५ दरम्यान, जगभरात ब्यूबोनिक प्लेगची सुमारे ३२४८ प्रकरणे नोंदवली गेली आहेत. त्यापैकी ५८४ लोकांचा मृत्यू झाला आहे. या वर्षातील बहुतेक प्रकरणे डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कांगो, मादागास्कर, पेरू येथे आली. यापूर्वी १९७० ते १९८० पर्यंत हा रोग चीन, भारत, रशिया, आफ्रिका, लॅटिन अमेरिका आणि दक्षिण अमेरिकन देशांमध्ये आढळून आला आहे.
7 / 11
६ व्या आणि ८ व्या शतकात ब्यूबोनिक प्लेगला जस्टिनियन प्लेग असे नाव देण्यात आले. या आजाराने त्या वेळी संपूर्ण जगात सुमारे २.५ ते ५ कोटी लोकांचा बळी घेतला होता. १३४७ मध्ये जगावर ब्यूबोनिक प्लेगचा दुसरा हल्ला झाला. मग त्याला ब्लॅक डेथ असे नाव देण्यात आले. या काळात त्याने युरोपच्या एक तृतीयांश लोकसंख्येचा नाश केला होता.
8 / 11
ब्यूबोनिक प्लेगचा तिसरा हल्ला १८९४ च्या सुमारास जगावर झाला. मग यात ८० हजार लोक मारले गेले. त्याचा सर्वाधिक प्रभाव हाँगकाँगच्या आसपास दिसला. १९९४ मध्ये भारतातील पाच राज्यांमध्ये ब्यूबोनिक प्लेगची सुमारे ७०० प्रकरणे नोंदवली गेली. त्यापैकी ५२ लोकांचा मृत्यू झाला. काळ्या मृत्यूला कारणीभूत जीवाणू येरसिनिया पेस्टिस जीवाणू ५ हजार वर्षांपेक्षा जास्त जुना आहे.
9 / 11
ब्लॅक डेथ बॅक्टेरियाचे कौटुंबिक वंशवृक्ष ७ हजार वर्षे जुने असल्याचे सांगितले जाते. पण पाच हजार वर्षे की सात हजार वर्षे असा वाद आहे. अलीकडे, शास्त्रज्ञांना लॅटव्हियामधील रिनुकलन्स नावाच्या भागात एका शिकारीची कवटी सापडली. ज्याचे नाव RV2039 होते. त्याच्या सांगाड्यात यर्सिनिया पेस्टिस खूप जास्त आढळलं. तो यर्सिनिया स्यूडोट्यूबरक्युलोसिस या जीवाणूचा वंशज होता.
10 / 11
या जीवाणूंनी या कवटींना म्हणजेच त्या काळातील मानवांना कसा संसर्ग केला हे अद्याप माहित नाही. शास्त्रज्ञांना माहित आहे की, शिकारीच्या मृत्यूच्या वेळी त्याच्या रक्तात या जीवाणूंचे प्रमाण खूप जास्त होते. त्याच वेळी, हे देखील आढळले की त्याचे पूर्वज जीवाणू इतके धोकादायक आणि जीवघेणे नव्हते. लहान माशांकडून उंदरांकडे आणि उंदरांच्या चाव्याद्वारे मानवांमध्ये त्याचे जनुक संक्रमित केले. आता उंदीर प्रत्येकाला चावत नाहीत, म्हणून ५ हजार वर्षांपूर्वी ते इतके पसरले नव्हते.
11 / 11
डॉ अन्ना पोपोवा यांनी सांगितले की, कोरोनाच्या काळात चीन, मंगोलिया आणि रशियाच्या काही भागांमध्ये या आजाराची प्रकरणे नोंदवली गेली होती, परंतु ती लवकरच नियंत्रित केली गेली. सायबेरियाच्या सीमेला लागून असलेल्या तुवा आणि अल्ताई येथील हजारो लोकांना ब्यूबोनिक प्लेगपासून वाचवण्यासाठी लसीकरण करण्यात आले. अल्ताईमध्ये हा आजार ६० वर्षांनंतर नोंदला गेला.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याrussiaरशिया