शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus News: रामबाण उपाय! देशाचा 'हनुमान' आला कामी; कोरोना संकटात मिळाली 'संजीवनी'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2021 4:51 PM

1 / 10
देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत आहे. मे महिन्यात देशात दररोज कोरोनाचे ४ लाखांहून अधिक रुग्ण आढळून येत आहेत. योग्य उपचार न मिळाल्यानं, ऑक्सिजनअभावी रुग्णांचे जीव जात आहेत.
2 / 10
कोरोना रुग्णांचे नातेवाईक ऑक्सिजनसाठी वणवण फिरत आहेत. मात्र तरीही अनेकांना ऑक्सिजन मिळत नाही. ऑक्सिजन आणण्यासाठी ट्रेनचा वापर करावा लागत आहे. हवाई दलाची विमानं ऑक्सिजन वाहतूक करणारे रिकामे टँकर्स नेत आहेत.
3 / 10
परदेशांमधून भारताला वैद्यकीय मदत पुरवली जात आहे. अनेक देश भारताला ऑक्सिजनचा पुरवठा करत आहेत. ऑक्सिजन तुटवड्यामुळे देशात अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली असताना आता डीआरडीओनं यावर रामबाण उपाय शोधून काढला आहे.
4 / 10
कोरोना रुग्णांच्या उपचारांत वापरता येईल अशा औषधाची निर्मिती डीआरडीओनं केली असून या औषधाला डीसीजीआयनं परवानगी दिली आहे. मध्यम ते गंभीर लक्षणं असलेल्या कोरोना रुग्णांना तोंडावाटे हे औषध देता येईल. या औषधाला २-डीजी असं नाव देण्यात आलं आहे.
5 / 10
देशातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना, आरोग्य व्यवस्थेवर अभूतपूर्व ताण असताना डीआरडीओनं तयार केलेल्या औषधाला परवानगी मिळाली आहे.
6 / 10
संरक्षण आणि संशोधन विकास या देशातील प्रतिष्ठित संस्थेनं हैदराबादच्या डॉ. रेड्डी लॅबॉरेटरीच्या सहकार्यानं २ डीजीची निर्मिती करण्यात आली आहे. या औषधाचं पूर्ण नाव २-डीऑक्सी-डी-ग्लुकोज आहे. या औषधाची निर्मिती प्रक्रिया फारशी अवघड नाही. त्यामुळे त्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेणं सहज शक्य आहे.
7 / 10
२-डीजी औषध पावडर स्वरुपात उपलब्ध होईल. पाण्यात टाकून हे औषध घेता येईल. सोप्या शब्दांत सांगायचं झाल्यास हे औषध इनोसारखं घेता येईल.
8 / 10
२-डीजी औषधाची किंमत नेमकी किती असणार याबद्दलची अधिकृत माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. मात्र औषधाच्या एका पॅकेटची किंमत ५०० ते ६०० रुपये असू शकते. डॉ. रेड्डीज कंपनीकडून लवकरच या औषधाची किंमत जाहीर केली जाऊ शकेल.
9 / 10
२-डीजी औषधामुळे कोरोना रुग्ण लवकर बरा होतो. या औषधामुळे ऑक्सिजनवरील अवलंबित्व कमी होतं. या औषधाच्या तीन चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. २-डीजी औषध घेतलेल्या रुग्णांना ऑक्सिजन सिलिंडरची कमी गरज लागली.
10 / 10
२-डीजी औषध घेतलेले रुग्ण इतरांच्या तुलनेत लवकर बरे होत असल्याचं चाचण्यांमधून दिसून आलं. ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे देशात आणीबाणीची स्थिती आहे. अशा परिस्थितीत २-डीजी देशासाठी संजीवनी ठरू शकतं.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या