शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Coronavirus : खरंच कोरोना व्हायरस कमजोर पडतोय का? वाचा यावर WHO ने काय सांगितलं....

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2020 12:57 PM

1 / 10
WHO म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने सोमवारी एका रिपोर्टमध्ये इशारा देत सांगितले की, कोरोना व्हायरसने अजूनही त्याची क्षमता गमावलेली नाही. हा व्हायरस आधीसारखाच जीवघेणा आहे, ज्याने हजारो लोकांचा जीव जात आहे. (Photo: AFP)
2 / 10
WHO चे इमरजन्सीचे एक्झीक्यूटीव्ह डायरेक्टर डॉक्टर माइक रेयान यांनी जिनेव्हामध्ये एका पत्रकार परिषदेत सांगितले की, 'आपण खूप जास्त सावध राहण्याची गरज आहे. आपण असा विचार अजिबात करू नये की, या व्हायरसने त्याची क्षमता गमावली आहे. असं अजिबात होत नाहीये'.
3 / 10
इटलीतील एका डॉक्टरने एक दिवसांआधीच कोरोना व्हायरस कमजोर होत असल्याबाबत वक्तव्य केले होते. इटलीच्या डॉक्टरांनी केलेल्या दाव्यात किती सत्यता आहे हे जाणून घेण्यासाठी या पत्रकार परिषदेत त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता.
4 / 10
लोम्बार्डीच्या सॅन राफेल हॉस्पिटलनचे मुख्य अल्बर्टो जांग्रिलो यांनी इटलीतील एका ब्रॉडकास्ट कंपनीला सांगितले होते की, 'हा व्हायरस आता क्लीनिकली रूपाने इटलीमध्ये राहिलेला नाही. हा आधीच्या तुलनेत कमजोर पडला आहे. गेल्या 10 दिवसात घेण्यात आलेल्या स्वॅबमधून हे समोर येतं की, एक किंवा दोन महिन्यांच्या तुलनेत आता व्हायरस लोडचं प्रमाण फार कमी आहे'.
5 / 10
WHO चे इमरजन्सी डिसीज अॅन्ड जूनोजिस यूनिटचे प्रमुख डॉक्टर मारिया वॅन करखोव हे सोमवारी म्हणाले की, 'मी तो रिपोर्ट पाहिला नाही. पण असे उपाय आहेत ज्याद्वारे सरकार व्हायरसचं पसरणं कमी करू शकतात. यात जास्तीत जास्त टेस्टिंग आणि लागण झालेल्या रूग्णांना आयसोलेशनमध्ये पाठवण्यासारख्या बाबींचा समावेश आहे.
6 / 10
ते म्हणाले की, 'जर आपण व्हायरसला असंच सोडून दिलं तर तो आणखी पसरेल. यावर लक्ष दिलं नाही तर तो आणखी लोकांना संक्रमित करेल आणि जवळपास 20 टक्के लोकांना याची लागण होईल. कोरोना व्हायरस हा प्रत्येक व्यक्तीला वेगळ्या प्रकारे प्रभावित करू शकतो.
7 / 10
डॉ. मारियांनी सांगितले की, कोरोना व्हायरस संपूर्ण जगात लोकांना संक्रमित करत आहे. पण अशाही अनेक गोष्टी आहेत ज्यांच्या मदतीने आपण हे संक्रमण पसरण्यापासून रोखू शकतो.
8 / 10
जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या रिपोर्टनुसार, साधारण 5 महिन्यांआधी वेगाने पसरू लागलेल्या या व्हायरसने आतापर्यंत 60 लाखपेक्षा अधिक लोकांना संक्रमित केलंय आणि आतापर्यंत 3 लाख 70 हजारांपेक्षा जास्त लोकांचा याने जीव गेला आहे.
9 / 10
WHO च्या अधिकाऱ्यांनी गेल्या आठवड्यात इशारा देत सांगितले होते की, ज्या देशांमध्ये व्हायरसचा प्रभाव कमी होत आहे. तिथे याचं थैमान पुन्हा बघायला मिळू शकतं. याचं प्रमाण चीन हा देश आहे. हाच या व्हायरसचा गढ मानला जातो.
10 / 10
सध्या या व्हायरसचं जास्त थैमान दक्षिण अमेरिका आणि ब्राझीलच्या रियो डी जेनेरियो आणि साओ पोलोमध्ये बघायला मिळत आहे. त्यामुळे कोरोनाची क्षमता कमी झाली असे समजून कोणतीही चूक करू नका. (Image Credit : forbes.com)
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याWorld health organisationजागतिक आरोग्य संघटना