खुशखबर! 'या' आजाराच्या लसीने कोरोना विषाणूंचा होणार खात्मा; टळू शकतो मृत्यूचा धोका

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2020 09:59 AM2020-06-15T09:59:17+5:302020-06-15T12:02:45+5:30

कोरोना व्हायरसच्या वाढत्या संक्रमणात जगभरातील शास्त्रज्ञ लस आणि औषधं तयार करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. भारत, अमेरिका, ब्रिटन यांसह अनेक देशात पहिल्या ट्प्प्यातील लसींचे प्रयोग यशस्वी झाले आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या चाचण्यांचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. अलिकडे करण्यात आलेल्या संशोधनानुसार पोलिओची लस कोरोना संक्रमणापासून वाचवू शकते. कोरोनापासून बचाव करण्याासाठी पोलियोची लस कशी परिणामकारक ठरू शकते जाणून घेऊया.

मेडिकल जर्नल सायंसमध्ये प्रकाशित केलेल्या शोधानुसार ओरल पोलियो वैक्सीन (OPV) मुळे कोरोना व्हायरसचा धोका कमी होऊ शकतो. त्यासोबतच ओपीवी कोरोनाच्या रुग्णांद्वारे इतरांपर्यत संक्रमण परसण्यापासून वाचवता येऊ शकतं. लसीत असणारे इंटरफेरानमुळे कोरोना व्हायरसच्या संक्रमणापासून वाचता येऊ शकतं. याशिवाय रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी ही लस परिणामकारक ठरू शकते. असं संशोधनातून दिसून आले आहे.

रिसर्चमध्ये दिसून आलं की, आधीपासून तयार असलेल्या लसीचा इतर व्हायरसच्या संक्रमणापासूनही बचाव करता येऊ शकतो. या संशोधनादरम्यान दिसून आलं की. पोलिओची लस दिल्यानंतर इंफ्लूएंजा व्हायरसमुळे होत असलेल्या मृत्यूंचा धोका तीन पटीने कमी झाला.

कोरोनाचं संक्रमण रोखण्यासाठी पोलिओच्या लसीवर अनेक वायरोलॉजिस्ट तज्ज्ञ संशोधन करत आहेत. या संशोधन प्रक्रियेत ज्यांनी एचआयव्ही व्हायरसचा शोध लावला होता. असे अमेरिकेतील डॉ. रॉबर्ट गॅलो यांचा सुद्धा सहभाग आहे.

रुसचे शास्त्रज्ञ डॉ. अल्बर्ट सेबिन यांनी १९६१ मध्ये ओरल पोलियो लसीचा शोध लावला होता.

या लसीमुळे शरीरात असलेल्या व्हायरसला निष्क्रिय केले जाते. तसंच आजार पसरवणारी व्हायरसची क्षमता नष्ट केली जाते.

अमेरिकेतील फूड एंड ड्रग एडमिनिस्ट्रेशनचे संचालक आणि व्हायरस विषेशज्ञ डॉ. कॉन्सटेन्टिन चुमाकोव यांनी दिलेल्या माहितीनुसार ओरल पोलीयोची लस, माणसांची रोगप्रतिकारकशक्ती व्हायरसशी लढण्याासाठी तयार होत नाही. तोपर्यंत व्हायरसशी लढण्यासाठी परिणामकारक ठरते. डॉ. कॉन्सटेन्टिन यांनी सांगितले की, कोरोनाशी लढण्यााठी पोलीओची लस परिणामकारक ठरू शकते. तसंच रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी ही लस परिणामकारक ठरू शकते.

मेडिकल जर्नल साइंसमध्ये हे संशोधन प्रकाशिक झाले असून त्याबाबात अधिक माहिती देण्यात आली आहे. या संशोधनातून दिसून येते की, कोरोना व्हायरस शरीरातील रोगप्रतिराकशक्ती कमी करतो. तीव्र श्वसन सिंड्रोम कोरोना व्हायरसमध्ये ओपीवी या लसीचा वापर लहानपणापासून केल्यास रोगप्रतिराकशक्ती वाढवता येऊ शकते.

तसंच संक्रमणापासून वाचवता येऊ शकतं. चाचणीत या लसीचे सकारात्मक परिणाम दिसून आल्यास मोठ्या प्रमाणात लोकसंख्येला कोरोनापासून वाचवण्यासाठी वापर करता येऊ शकतो.