CoronaVirus News : चिंता वाढली! कोरोनातून बरं झाल्यावरही आहे हार्ट अटॅक, स्ट्रोकचा धोका; रिसर्चमधून मोठा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2022 17:21 IST
1 / 14जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. अनेक देशांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क, सोशल डिस्टंसिंग, होम क्वारंटाईनच्या माध्यमातून काळजी घेतली जात आहे. 2 / 14वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नवनव्या व्हेरिएंटने तर आणखी चिंता वाढवली आहे. कोरोनावर अनेक रिसर्च करण्यात येत असून त्यामधून महत्त्वाची माहिती समोर येत आहे. 3 / 14कोरोनातून बरं झाल्यावरही हार्ट अटॅक, स्ट्रोकचा धोका असल्याचा आता दावा करण्यात येत आहे. कोरोना व्हायरसचा संसर्ग होताच शरीरातील अनेक अवयवांवर त्याचा परिणाम होतो. विशेषत: त्याचा हृदयावर अधिक परिणाम होतो. 4 / 14अमेरिकेतील एका नवीन संशोधनात असा दावा करण्यात आला आहे की, कोविड संसर्गातून बरे झाल्यानंतरही रुग्णांना हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक आणि हार्ट फेल्योरचा धोका असतो. हा धोका अशा लोकांना देखील होतो ज्यांच्यामध्ये कोणतीही लक्षणे दिसत नाहीत.5 / 14वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी एका वर्षाहून अधिक काळ कोरोना झालेल्या 1 लाख 53 हजार 760 लोकांच्या आरोग्याचा मागोवा घेतला. या डेटाची 56 लाखांहून अधिक लोकांशी तुलना करण्यात आली. या लोकांना कधीच कोरोना संसर्ग झाला नव्हता.6 / 14संशोधनात शास्त्रज्ञांना आढळले की जे रुग्ण कोरोना संसर्गाच्या 30 दिवसांत बरे झाले, त्यांना हार्ट स्ट्रोकचा धोका 1.5 पट जास्त आहे. याव्यतिरिक्त, हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका 1.6 पटीने वाढला आहे.7 / 14हार्ट फेल्योरचा धोका 1.7 पटीने वाढला आहे. याशिवाय अशा रुग्णांमध्ये हृदयाचे ठोके अनियमित होण्याचा धोका 1.6 पट आणि हृदयावर सूज होण्याचा धोका देखील दुप्पट असतो असं म्हटलं आहे.8 / 14कोरोनाने ग्रस्त असलेल्यांमध्ये डीप वेन थ्रोम्बोसिसचा धोकाही दुप्पट होतो. ही अशी जीवघेणी स्थिती आहे ज्यामध्ये शरीराच्या नसांमध्ये रक्ताच्या गुठळ्या जमा होतात. यामुळे हृदयाच्या नसाही ब्लॉक होऊ शकतात.9 / 14संशोधनात, हृदयविकाराचा धोका सर्व वयोगटातील लोकांमध्ये समान असल्याचे आढळून आले. लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्टेरॉल आणि किडनीच्या आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांनाही कोरोना बरे झाल्यानंतर हृदयविकाराचा धोका सारखाच असल्याचे आढळून आले.10 / 14संशोधनानुसार, जर तुम्हाला कोरोनाची लागण झाली असेल तर तुम्हाला हृदयविकाराचा धोका नेहमीच असतो. हा धोका जास्त किंवा कमी असला तरी तो संसर्गाच्या तीव्रतेवर अवलंबून असतो. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 11 / 14कोरोनाने संपूर्ण जगात धुमाकूळ घातला आहे. रुग्णांच्या संख्येत देखील वाढ होत असून तब्बल 40 कोटींचा टप्पा पार केला आहे. तर कोरोनाने आतापर्यंत लाखो लोकांचा बळी घेतला आहे. अशातच अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. 12 / 14एकदा जरी रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला तर अनेकांच्या पायाखालची जमीन सरकते. याच दरम्यान एका व्यक्तीला एकदा, दोनदा नाही तर तब्बल 78 वेळा कोरोना झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. 13 / 14तुर्कस्तानातील एक व्यक्ती गेल्या 14 महिन्यांत 78 वेळा कोरोना पॉझिटिव्ह झाली आहे. वर्षभरापासून तो आयसोलेशनमध्येच आहे. 56 वर्षीय मुझफ्फर कायासन यांना नोव्हेंबर 2020 साली पहिल्यांदा कोरोनाची लागण झाली. तेव्हा त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले. 14 / 14काही दिवसांनी त्याच्यातील कोरोना लक्षणं कमी झाली. पण जेव्हा पुन्हा कोरोना टेस्ट केली तेव्हा त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला नाही. 78 वेळा त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली. पण प्रत्येक वेळेला त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्हच येत आहे.