1 / 9कोरोनाचा प्रसार जेव्हा भारतात सुरू झाला तेव्हा थंडीचं वातावरण होतं. अनेकांनी असा अंदाज वर्तवला होता की कोरोनाचा प्रसार उन्हाळ्यात कमी होईल किंना पूर्णपणे नष्ट होईल. तर काही शास्त्रज्ञांनी दावा केला होता की, कोरोनाचं स्वरूप तापमान वाढल्यानंतर बदलू शकतं. आता काही दिवसातच पावसाचं आगमन होण्याची शक्यता आहे. पावसाळ्यात कोरोनाचा धोका जास्त प्रमाणात असू शकतो का अशी भीती सगळ्यांनाच मनात आहे. कारण वातावरणात बदल झाले की, अनेकांना सर्दी, खोकल्याची समस्या उद्भवते त्यात आता कोरोनाची माहामारी त्यामुळे धाोका जास्त वाढणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 2 / 9युनिव्हर्सिटी ऑफ डेलावेयरमधील एपिडेमिओलॉजी विभागातील शास्त्रज्ञ डॉ. जेनिफर होर्ने यांनी wboc शी बोलताना पावसावरून चिंता व्यक्त केली. पाण्यामुळे विषाणूही नष्ट होत नाही. कोरोनाचा विषाणूही इतर व्हायरसप्रमाणेच होईल, असं मानलं जातं आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार इंडियन इन्स्टिट्युट ऑफ सायन्स बंगळुरूचे प्राध्यापक राजेश सुंदरसन यांनी सांगितलं, जसं आपण आपलं रोजचं जीवन सुरू करू तसा इन्फेक्शनचा धोका वाढू शकतो. 3 / 9दैनिक भास्करमध्ये एम्सच्या कम्युनिटी मेडीसनचे प्राध्यापक डॉ. संजय राय यांनी सांगितले की, कोरोना विषाणू आणि पाऊस याबाबत सध्या विशेष अभ्यास करण्यात आलेला नाही. मात्र पावसाळ्यात व्हायरसची सक्रियता कमी नही होणार तर उलट तीव्रता आणखी वाढेल, असं आपण म्हणू शकतो. कारण या कालावधीत तापमान आणि आर्द्रता कोणताही व्हायरस पसरण्यास आणि जास्त कालावधी राहण्यास अनुकूल असतं.4 / 9युनिव्हर्सिटी ऑफ मेरलँड चिल्ड्रन्स हॉस्पिटलच्यामधील तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार पाण्यामुळे व्हायरस नष्ट होत नाही. उलट आर्द्रता आणि कमी तापमानात व्हायरस जिवंत राहण्याचा आणि वाढण्याचा धोका वाढतो.5 / 9आता अनेक देश लॉकडाऊन हटवत आहेत. यादरम्यान पावसाच्या पाण्याशी संपर्कात आल्याने धोका आणखी वाढेल. 6 / 9सध्या सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शने आणि WHO ने पाणी आणि कोरोना विषाणूंबाबत माहिती दिलेली नाही. ऋतूशी संबंधित संक्रमकता पाहणंही गरजेचं आहे, असं शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे.7 / 9सध्या सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शने आणि WHO ने पाणी आणि कोरोना विषाणूंबाबत माहिती दिलेली नाही. ऋतूशी संबंधित संक्रमकता पाहणंही गरजेचं आहे, असं शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे.8 / 9सध्या सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शने आणि WHO ने पाणी आणि कोरोना विषाणूंबाबत माहिती दिलेली नाही. ऋतूशी संबंधित संक्रमकता पाहणंही गरजेचं आहे, असं शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे.9 / 9सध्या सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शने आणि WHO ने पाणी आणि कोरोना विषाणूंबाबत माहिती दिलेली नाही. ऋतूशी संबंधित संक्रमकता पाहणंही गरजेचं आहे, असं शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे.