शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus News : टक्कल असलेल्या पुरुषांना कोरोनाचा सर्वाधिक धोका; वेळीच व्हा सावध

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2020 12:12 PM

1 / 12
जगभरात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. चिंता वाढवणारी आकडेवारी सातत्याने समोर येत आहे. जगातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही तब्बल 68 लाखांवर गेली आहे.
2 / 12
भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. मात्र तरीही रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे.
3 / 12
देशात धोका वाढला असून कोरोनाच्या आकडेवारीने आतापर्यंतचा नव्या रुग्णांच्या संख्येचा रेकॉर्ड मोडला आहे. गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली असून चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे.
4 / 12
भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 236657 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात 6642 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
5 / 12
कोरोनासंदर्भात रिसर्चमधून वेगवेगळी माहिती समोर येत आहे. याच दरम्यान टक्कल असलेल्या पुरुषांना इतरांपेक्षा कोरोना व्हायरस संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो असा दावा करण्यात आला आहे.
6 / 12
टक्कल असलेल्या पुरुषांना कोरोनाचा सर्वाधिक धोका असल्याची माहिती एका रिसर्चमधून समोर आली आहे. अमेरिकेच्या ब्राउन युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी याबाबत दावा केला आहे.
7 / 12
संशोधक प्रोफेसर कार्लोस वॅम्बीयर यांनी पुरुषांमधील टक्कल हे कोविड-19 च्या गंभीर संसर्गासाठी धोकादायक घटक असल्याचं म्हटलं आहे.
8 / 12
टक्कल असलेल्या कोरोनाग्रस्तांचा अभ्यास केला गेला. यामध्ये कोरोनामुळं मृत्यू होण्याचा धोका स्त्रियांपेक्षा पुरुषांपेक्षा जास्त असल्याचं दिसून आलं आहे.
9 / 12
41 कोरोना रूग्णांवरील संशोधनात असे दिसून आलं आहे की त्यापैकी 71 टक्क्यांहून अधिक पुरुषांना टक्कल होते. स्पेनच्या एका रुग्णालयात हा रिसर्च करण्यात आला.
10 / 12
122 कोरोना रूग्णांवर संशोधन केलं गेलं होतं, त्यातील 79 टक्के रुग्णांना टक्कल असल्याच माहिती आणखी एका रिसर्चमधून समोर आली आहे.
11 / 12
पुरुषांच्या सेक्स हार्मोन एंड्रोजनमुळे कोरोना विषाणूची लागण होण्याची क्षमता वाढू शकते. अशा हार्मोनमुळे पुरुषांमध्ये औषधांचा प्रभाव कमी होत आहे आणि रुग्ण गंभीर आजारी पडतात असा दावा संशोधकांनी केला आहे.
12 / 12
संशोधकांच्या मते टक्कल पडणं आणि कोरोनाचा संसर्ग यांच्यात एक विशेष संबंध आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतHealthआरोग्यdoctorडॉक्टर