CoronaVirus Live Updates : बापरे! कोरोनामुळे आता डायबिटीजचा मोठा धोका; सर्वसामान्यांची वाढतेय शुगर लेव्हल, वेळीच व्हा सावध
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2021 11:07 IST
1 / 14देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येने प्रशासनाच्या चिंतेत भर टाकली आहे. मास्क, सोशल डिस्टंसिंग, होम क्वारंटाईन, आयसोलेशनच्या माध्यमातून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. 2 / 14देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 3,28,57,937 वर पोहोचला आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 47,092 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 509 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. 3 / 14कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 4,39,529 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असल्याने चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. याच दरम्यान अनेक गोष्टी समोर येत आहेत. एका रिसर्चमधून महत्त्वाची माहिती आता समोर आली आहे.4 / 14देशभरात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. मात्र कोरोनातून बरे झाल्यानंतरही रुग्णांची चिंता वाढली आहे. त्यांना आरोग्य विषयक अनेक गंभीर समस्यांचा सामना करावा लागत असल्याची माहिती मिळत आहे.5 / 14कोरोना संसर्गामुळे आता डायबिटीजचा मोठा धोका निर्माण झाला आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या शरीरातील शुगर लेव्हल वाढत आहे. देशातील डायबिटीज रुग्णांच्या संख्येत देखील आता अचानक वाढ झाली आहे. 6 / 14दिल्लीमध्ये डायबिटीजच्या रुग्णांमध्ये 60 टक्क्यांची वाढ झाली आहे. डॉक्टरांनी देखील कोरोनासोबत डायबिटीज रुग्णाचे प्रमाण वेगाने वाढत असल्याचं म्हटलं आहे. प्रामुख्याने कोरोना रुग्णांच्या रक्तातील साखरेचं प्रमाण हे वाढत आहे. 7 / 14काही दिवसांनी ते प्रमाण कमी देखील होतं. मात्र काही लोकांच्या रक्तातील साखरेचं प्रमाण हे कमीच होत नाही. कोरोनातून ठीक झाल्यानंतर तीन महिन्यांनी देखील त्यांची शुगर लेव्हल वाढलेलीच पाहायला मिळाली आहे. 8 / 14कोरोना पँक्रियाजवर अटॅक करतो. कोरोनाचा व्हायरस बीटा पेशींना तोडतो. यामुळे इन्सुलिनचे प्रमाण कमी होते आणि साखरेचे प्रमाण वाढते. याच दरम्यान याबाबत AIIMS ने एक नवीन प्रोटोकॉल जाहीर केला असून महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 9 / 14डायबिटीज रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये रुग्णालयात भरती झाल्यावर रुग्णांची डायबिटीज तपासणी देखील केली जाणार आहे. रक्तातील साखरेचं प्रमाण वाढल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. 10 / 14कोरोनाच्या संकटात आरोग्याची काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. पोषक आहार घेणं गरजेचं आहे. आपल्या जेवणात पौष्टीक घटकांचा समावेश करावा. तसेच रोज व्यायाम करण आरोग्याच्या दृष्टीने उत्तम असल्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 11 / 14कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर रुग्णांना ब्लॅक फंगसचा देखील धोका आहे. तसेच संसर्गाचे हृदय, डोळे आणि फुफ्फुसांनंतर गंभीर परिणाम होत आहेत. यानंतर आता कोरोना कानावर अटॅक करत असल्याची धडकी भरवणारी माहिती मिळत आहे.12 / 14कान दुखणे, ऐकण्याची क्षमता कमी होणे, कान जड होणे, घंटी किंवा शिटी वाजवल्यासारख्या आवाजाचा भास होणं अशा समस्या आता रुग्णांमध्ये आढळून येऊ लागल्या आहेत. कोरोनामुळे रुग्णांना नीट झोप देखील लागत नाही. डॉक्टरांच्या मते हा कोरोनाचा नवा स्ट्रेन ड़ेल्टा व्हेरिएंट असू शकतो.13 / 14रुग्णांमध्ये सेंसरी न्यूरल हियरिंग लॉस पाहायला मिळत आहे. व्हायरल इन्फेक्शनमुळे हा त्रास होतो. कोरोना व्हायरस नाकाच्या माध्यमातून इम्यून सिस्टमवर अटॅक करतो. नाक आणि कान हे कनेक्टेड असतात. जे इन्फेक्शन नाकात असतं ते पुढे कानात जातं. त्यामुळे व्हायरल इन्फेक्शनने रिएक्शन होतं. कान डॅमेज होऊ शकतो.14 / 14किशनगड-रेनवालचे निवासी असलेल्या एका 40 वर्षीय व्यक्तीला कोरोना संक्रमण झाल्यानंतर एक महिन्यांनी अचानक कानाने ऐकू येणंच बंद झालं. याला मेडिकल भाषेत सडन सेंसरी न्यूरल हियरिंग लॉस असं म्हटलं जातं. यासाठी रुग्णाला ऑक्सिजन थेरपी दिली जाते.