शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Coronavirus : 'हा' आहे कोरोनापासून बचावासाठी हॅडवॉश आणि सोशल डिस्टंसिंगपेक्षाही बेस्ट उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2020 15:53 IST

1 / 9
अमेरिकेत करण्यात आलेल्या रिसर्चमधून असा स्पष्ट संकेत मिळतो की, हॅंडवॉश आणि सोशल डिस्टंसिंगच्या तुलनेत फेस मास्क हा मनुष्यांना कोरोना व्हायरसपासून वाचवण्यासाठी अधिक फायदेशीर आहे. हा रिसर्च विमानवाहक जहाज थियोडोर रूझवेल्टवर करण्यात आला. यावर साधारण एक हजार लोक कोरोनाने संक्रमित झाले होते.
2 / 9
मार्चमध्ये थियोडोर रूझवेल्टचे 4 हजार 900 क्रू मेंबर्सपैकी 1 हजारपेक्षा अधिक लोक कोरोना पॉझिटिव्ह झाले होते. एकाचा मृत्युही झाला होता. या जहाजाच्या कॅप्टनला त्यांच्या पदावरून हटवण्यात आलं होतं. नंतर नेव्ही आणि अमेरिकेच्या सेंटर फॉर डिजीज कंट्रोलने या जहाजावरील 382 क्रू मेंबर्सचे सॅम्पल घेऊन रिसर्च केला.
3 / 9
अधिकाऱ्यांनी हे समजून घेण्याचा प्रयत्न केला की, कशाप्रकारे या जहाजावर कोरोनाच्या केसेस अधिक वाढल्या आणि कशाप्रकारे काही लोक यातून बचावले.
4 / 9
डेली मेलमध्ये प्रकाशित एका रिपोर्टनुसार, अधिकाऱ्यांना आढळून आले की, मास्क घालणाऱ्या आणि न घालणाऱ्या लोकांमध्ये कोरोनाने संक्रमित होण्यात 25 टक्के अंतर होतं.
5 / 9
सोशल डिस्टंसिंगचं पालन करणारे आणि न करणाऱ्या लोकांमध्ये कोरोना संक्रमित होण्यात 15 टक्के अंतर होतं. तसेच हॅंडवॉश करणे आणि न करणे यांच्यात केवळ 3 टक्के अंतर होतं.
6 / 9
दरम्यान अनेक महिने एक्सपर्ट्समध्ये हा वाद होत राहिला की, मास्क कोरोनापासून बचावासाठी किती जास्त फायदेशीर आहे. अनेक एक्सपर्ट्स म्हणाले होते की, मास्कने कोरोनापासून बचावाचे हलके पुरावे आहेत. (Image Credit : bangkokpost.com)
7 / 9
अनेक देशांमध्ये फार उशीरा सर्वच लोकांना कोरोनापासून बचावासाठी मास्क वापरण्याचा सल्ला देण्यात आलाय. आता अनेक देशांमध्ये मास्क अनिवार्य करण्यात आलाय.
8 / 9
थियोडोर रूझवेल्ट जहाजावर करण्यात आलेल्या या रिसर्चमधून समोर आलं की, ज्या लोकांनी कोरोनापासून बचावांच्या साधनांचा वापर केला, त्यांना लागण होण्याच्या केसेस कमी होत्या.
9 / 9
थियोडोर रूझवेल्ट जहाजावर करण्यात आलेल्या या रिसर्चमधून समोर आलं की, ज्या लोकांनी कोरोनापासून बचावांच्या साधनांचा वापर केला, त्यांना लागण होण्याच्या केसेस कमी होत्या.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याResearchसंशोधनHealth Tipsहेल्थ टिप्स