CoronaVirus : कोरोनाचे २० ते २५ दिवस नक्की कसे असतात? जाणून घ्या कोरोनाला हरवण्याचा मार्ग
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2020 12:28 IST
1 / 10कोरोना व्हायरसमुळे जगभरात भीतीचे वातावरण तयार झालं आहे. कारण कोरोनाची लागण होत असलेल्यांची आणि मृत्यू होत असलेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक अफवा सुद्धा पसरवल्या जात आहेत. नक्की विश्वास कशावर ठेवायचा हा मोठा प्रश्न आहे. 2 / 10चीनपासून सुरु झालेला हा व्हायरस जगभरातील 200 हून अधिक देशांमध्ये पसरला आहे. आज आम्ही तुम्हाला एखाद्या व्यक्तीला कोरोनाचे संक्रमण झाल्यानंतर शरीरावर कसा परिणाम होत जातो याबाबत सांगणार आहोत. 3 / 10कोरोनाच्या संक्रमणाबाबत संशोधकांनी दावा केला आहे. पहिल्या दिवशी हलका ताप, थकवा, स्नायूंमध्ये वेदना, सूका खोकला त्यांतर चौथ्या दिवशी श्वास घेण्यास त्रास होतो.4 / 10सातव्या दिवशी श्वास घेण्यास त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल व्हावं लागतं. आठव्या दिवशी तीव्र श्वसन त्रास निर्माण होतो. दहाव्या दिवशी आयसीयूत दाखल करण्यात येतं. त्यानंतर वेंटिलेटवरद्वारे देखरेखीखाली रुग्णाला ठेवलं जातं.5 / 10बारा दिवस झाल्यानंतर प्रकृतीत काही प्रमाणात सुधारणा घडून येते. श्वास घेण्यातील अडचणी आधीच्या दिवसांच्या तुलनेत कमी होते. १५ दिवसांनंतर अधिक गंभीर स्थिती असल्यास रुग्णांचा मृत्यू होण्याची शक्यता असते. 6 / 10वीस दिवस झाल्यानंतर रुग्ण पूर्णपणे बरासुद्धा होऊ शकतो. सध्या ४४ हजारापेक्षा जास्त लोकांचा मृत्य कोरोनामुळे झाला आहे. 7 / 10त्यामुळे या आजारापासून वाचण्यासाठी सरकारच्या आदेशाचं पालन करून सोशल डिस्टंसिंग पाळणं गरजेचं आहे. वैयक्तिक आणि सामाजिक पातळीवर स्वच्छता आणि नियम पाळल्यास हा आजार कमी करण्यास यश येईल.8 / 10गरजेव्यतिरिक्त घराच्या बाहेर पडणं टाळा. बाहेर गेल्यास मास्कचा वापर करा. अफवांवर विश्वास ठेवू नका.9 / 10 खोकणाऱ्या किंवा शिंकणाऱ्या लोकांपासून जास्तीत जास्त दूर रहा. आणखी एक महत्वाची बाब म्हणजे तुम्हाला जर कोरोनाची लक्षणे असतील किंवा सामान्य सर्दी-खोकला असेल तरी सुद्धा बाहेर पडू नका. योग्य तो सल्ला घेऊन चेकअप करा.10 / 10 खोकणाऱ्या किंवा शिंकणाऱ्या लोकांपासून जास्तीत जास्त दूर रहा. आणखी एक महत्वाची बाब म्हणजे तुम्हाला जर कोरोनाची लक्षणे असतील किंवा सामान्य सर्दी-खोकला असेल तरी सुद्धा बाहेर पडू नका. योग्य तो सल्ला घेऊन चेकअप करा.