शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus News : कोरोनामुळे तुमच्याही झोपेत झालेत का 'हे' बदल?; वेळीच व्हा सावध, रिपोर्टमुळे मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2022 3:46 PM

1 / 10
भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा चार कोटींवर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 8822 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 15 जणांचा मृत्यू झाला आहे.
2 / 10
कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 524792 लोकांना जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. दोन वर्षांनंतरही जग कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे.
3 / 10
अनेक देशांमध्ये अजूनही मोठ्या प्रमाणात लोक कोरोनाला बळी पडत आहेत. याच दरम्यान लोकांनी पोस्ट कोविड समस्या येत आहे. यामध्ये अनेक प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागत आहेत. झोपेची समस्या समोर आली आहे.
4 / 10
झोपेच्या समस्येचा मोठ्या प्रमाणात लोकांवर परिणाम होत आहे. कोरोनाच्या सुरुवातीच्या टप्प्यात लॉकडाऊन आणि घरात राहण्याच्या निर्बंधांमुळे अनेकांच्या झोपेत बदल झाला. पण आता 2 वर्षांनंतरही लोक या समस्येचा सामना करत आहेत.
5 / 10
रिपोर्टनुसार, काही लोक निद्रानाशाच्या लक्षणांची तक्रार करतात, ज्यामध्ये त्यांना झोप येत नाही, याला सामान्यतः 'कोरोनासोमनिया' किंवा 'कोविड निद्रानाश' असं म्हणतात. बर्‍याच लोकांना सतत थकवा जाणवतो, आणि त्यांना पुरेशी झोप मिळत नाही. याला 'लाँग कोविड' देखील म्हटलं जाते.
6 / 10
निरोगी rhinovirus संसर्ग किंवा 'सामान्य सर्दी' वर काम करणार्‍या अभ्यासात असे आढळून आले आहे की ज्या व्यक्तींमध्ये या आजाराची लक्षणे आहेत त्यांना झोपेचा कालावधी कमी मिळतो आणि लक्षणे नसलेल्या व्यक्तींपेक्षा कमी झोप येते.
7 / 10
श्वासोच्छवासाच्या संसर्गाने ग्रस्त असलेल्या लोकांवर केलेल्या आणखी एका अभ्यासात असे दिसून आले की जेव्हा लक्षणे आढळतात तेव्हा लोक अंथरुणावर जास्त वेळ घालवतात आणि त्यांच्या झोपेची वेळ वाढवतात, परंतु त्यांना पुरेशी झोप मिळत नाही.
8 / 10
झोपण्यात अडचण, अधिक अस्वस्थ झोप आणि अधिक हलकी झोप पाहायला मिळते. आणखी एका अभ्यासात असे दिसून आले आहे की कोरोना रूग्णांना कोरोना नसलेल्या रूग्णांपेक्षा झोपण्यास अधिक त्रास होतो.
9 / 10
कोरोनासारख्या विषाणूजन्य संसर्गामुळे झोपेत बदल हे आपल्या शरीराच्या रोगप्रतिकारक प्रतिक्रियेमुळे होत असले तरी, झोपेचा त्रास, जसे की अर्धवट झोप आणि वारंवार जागरण यामुळे हे होऊ शकतं.
10 / 10
रात्री कमी झोपेमुळे काही लोकांना दिवसा वारंवार डुलकी लागते. बराच वेळ झोप न लागणे किंवा रात्री जागरण होणे आणि पुन्हा झोप लागण्याची धडपड यामुळे निराशा येते. झोपण्याच्या चुकीच्या सवयी कायम राहिल्या तर त्यामुळे निद्रानाश होऊ शकतो. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
टॅग्स :Healthआरोग्य