By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2022 11:28 IST
1 / 10वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने चार कोटींचा टप्पा पार केला असून गेल्या 24 तासांत कोरोनाचे 5,379 नवे रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत कोरोनामुळे तब्बल 5,28,057 लोकांनी आपला जीव गमावला आहे. 2 / 10कोरोना व्हायरसचा जगभरात कहर पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. असं असताना आता ध़डकी भरवणारी माहिती समोर आली आहे. एका रिपोर्टमध्ये जर कोरोनाचा संसर्ग काही काळ सतत होत राहिला तर हार्ट अटॅक आणि ब्रेन स्ट्रोक सारखी परिस्थिती उद्भवू शकते असं म्हटलं आहे. 3 / 10काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, कोरोनाचा संसर्ग सौम्य असला तरी जर एखाद्या व्यक्तीला हा संसर्ग बराच काळ जडत असेल तर त्याला हार्ट अटॅक आणि ब्रेन स्ट्रोक होण्याची शक्यता असते. फोर्टिस एस्कॉर्ट्स हार्ट इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष डॉ. अशोक सेठ यांनी एका रिपोर्टमध्ये असे दिसून आले आहे की हृदयाशी संबंधित समस्या आणि न्यूरोलॉजिकल केसेसमध्ये 60 टक्के वाढ झाली आहे असं म्हटलं आहे. 4 / 10एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना डॉ. अशोक सेठ म्हणाले की, हजारो रुग्णांच्या एका वर्षातील अभ्यासात असे आढळून आले आहे की हार्ट अटॅक किंवा स्ट्रोकच्या घटनांमध्ये सामान्यपेक्षा 60 टक्के वाढ झाली आहे. जे आपल्याला स्पष्टपणे सांगते की दीर्घकाळापर्यंत कोरोनाचा सौम्य संसर्ग देखील हार्ट अटॅकची शक्यता वाढवतो.5 / 10लोकांना सल्ला देताना डॉ. सेठ म्हणाले की, जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही नेहमीपेक्षा जास्त दिवस कोरोनाच्या विळख्यात आहात, तर लगेच डॉक्टरांकडून तुमची तपासणी करून घ्या आणि कोणत्याही प्रकारच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका किंवा घरच्या घरी यावर उपचार करू नका. 6 / 10तुम्ही कोरोना व्हायरसवर मात केली असली आणि तरीही तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होत असेल किंवा छातीत दुखत असेल तर लगेच तुमच्या डॉक्टरांची संपर्क साधून त्यांचा सल्ला घ्या. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात खबरदारीच्या सर्व उपाययोजना केल्या जात आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 7 / 10जग कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत असताना हिवाळ्यात कोरोनाचा खतरनाक व्हेरिएंट येऊ शकतो अशी धडकी भरवणारी भविष्यवाणी तज्ज्ञांनी केली आहे. युरोपियन मेडिसिन एजन्सी (EMA) कडून असे सांगण्यात आले आहे की, युरोपीय देशांमध्ये या हिवाळ्यात कोरोनाचा नवा व्हेरिएंट समोर येऊ शकतो.8 / 10आरोग्य तज्ञांनी सरकारला अशा केसेस वाढण्यापूर्वी थांबवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यास सांगितले आहे. अलीकडेच, चीनमधील एका शहरात कोरोनामुळे लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत आगामी काळात भारतात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होऊ शकते का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.9 / 10आरोग्य तज्ञ आणि राष्ट्रीय IMA कोविड टास्क फोर्सचे सह-अध्यक्ष, डॉ राजीव जयदेवन म्हणाले की, कोरोनाचा नवा व्हेरिएंट हिवाळ्यात येईल की नाही हे कोणीही सांगू शकत नाही, कोणता प्रकार इतका धोकादायक असेल काहीही सांगता येत नाही. आतापर्यंत 6 व्हेरिएंट आली आणि गेली.10 / 10कोरोनाची लस आवश्यक आहे कारण त्यामुळे होणारे मृत्यू टाळता येऊ शकतात. हे संक्रमणापासून अधिक संरक्षण देखील प्रदान करतात असंही डॉ राजीव जयदेवन यांनी म्हटलं आहे. जगभरात कोरोना लसीकरण मोहीम वेगाने सुरू असून आतापर्यंत कोट्यवधी लोकांनी कोरोना लस घेतली आहे.