शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Corona Vaccination: दोन वेगवेगळ्या कंपन्यांच्या कोरोना लसीचे डोस घेतले तर?; संशोधनातून महत्त्वाची माहिती समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2021 8:15 PM

1 / 9
देशातील आलेली कोरोनाची दुसरी लाट ओसरत चालली आहे. देशात दररोज आढळून येत असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या आता कमी होत आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे.
2 / 9
तिसऱ्या लाटेचा धोका टाळण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढवण्याची आवश्यकता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. मात्र सध्या तरी देशात अनेक ठिकाणी लसींची टंचाई जाणवत आहे.
3 / 9
कोरोना लसीकरणाचा वेग वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कोरोना लसीच्या दोन डोसमध्ये अंतर ठेवणं गरजेचं आहे. एखाद्या व्यक्तीनं दोन्ही डोस एकाच कंपनीच्या लसीचं घेणं आवश्यक असतं. मात्र दोन्ही डोस वेगवेगळ्या लसींचे घेतल्यास काय होईल, याबद्दल सध्या संशोधन सुरू आहे.
4 / 9
एक डोस एका लसीचा आणि दुसरा डोस दुसऱ्याच लसीचा याला कॉकटेल लस म्हटलं जातं. अशा प्रकारचं लसीकरण केल्यास काय होईल, त्यानं धोका वाढेल की कमी होईल, याबद्दल स्पेनमध्ये संशोधन करण्यात आलं.
5 / 9
एखाद्या व्यक्तीनं पहिला डोस ऍस्ट्राझेनेकाच्या लसीचा घेतला आणि दुसरा डोस फायझरच्या लसीचा घेतला तर त्याचा प्रभाव जास्त असेल आणि त्यामुळे संबंधित व्यक्ती कोरोनापासून जास्त सुरक्षित राहील, अशी माहिती संशोधनातून समोर आली आहे.
6 / 9
सरकारी निधी प्राप्त कार्लोस- हेल्थ इन्स्टिट्यूटनं नुकताच एक अभ्यास केला. एखाद्या व्यक्तीला दोन्ही डोस ऍस्ट्राझेनेकाचे देण्यापेक्षा पहिला डोस ऍस्ट्राझेनेका आणि दुसरा डोस फायझरचा दिल्यास रक्तात ३० ते ४० पट जास्त अँटिबॉडीज तयार होतात, असं संशोधन सांगतं.
7 / 9
१८ ते ५९ वर्षांदरम्यानच्या ६७० लोकांचं लसीकरण केल्यानंतर त्यांच्यावर काय परिणाम होतो, याचा अभ्यास करण्यात आला. यापैकी ४५० जणांना फायझरची लस देण्यात आली. पैकी १.७ टक्के लोकांना डोकेदुखी आणि अंगदुखीचा त्रास जाणवला. लसीकरणानंतर होणारा हा त्रास गंभीर स्वरुपाचा मानला जात नाही.
8 / 9
स्पेनमध्ये अनेकांना ऍस्ट्राझेनेका लसीचा डोस देण्यात आला. त्यानंतर काहींच्या शरीरावर लालसर चट्टे दिसू लागले. त्यामुळे ऍस्ट्राझेनेका लसीसाठी पर्याय शोधले जाऊ लागले आहेत.
9 / 9
भारताप्रमाणेच स्पेननंदेखील ऍस्ट्राझेनेका लसीच्या दोन डोसमधील अंतर १६ आठवडे करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय दुसरे पर्यायदेखील शोधले जात आहेत.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस