By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2019 15:47 IST
1 / 71. कोमट पाणी पिणं फायदेशीर - तज्ज्ञ आरोग्य तज्ज्ञांच्या माहितीनुसार, शारीरिक प्रक्रिया सुरळीत सुरू राहण्यासाठी कोमट पाणी प्यावे. यामुळे शरीराला बराच फायदा होतो. कोमट पाण्यामुळे शरीर योग्यरितीनं डिटॉक्सही होते आणि पचनक्रियेच्याही समस्या कमी होतात. रक्ताभिसरणाची क्रियाही सुधारते. 2 / 72. वेदनाशामक - घरातील आणि घराबाहेरील कामे करुन बऱ्याचदा महिलांना थकवा जाणवतो, वेदना होतात. हा त्रास कमी होण्यासाठी महिलांनी कोमट पाणी प्यावे. यामुळे त्यांचे शरीर अधिक अॅक्टिव्ह राहते आणि शारीरिक वेदनाही कमी होतात. 3 / 73. मासिक पाळीदरम्यान होणारी डोकेदुखी - मासिक पाळीदरम्यान बहुतांश महिलांना डोकेदुखी, अंगदुखीचा त्रास होतो. मासिक पाळीदरम्यान कोमट पाणी पिणे शरीरासाठी फायदेशीर ठरते. 4 / 74. बद्धकोष्ठता - बद्धकोष्ठतेचा त्रास असणाऱ्या महिलांनी कोमट पाणी प्यावे. भरपूर प्रमाणात औषधांचे सेवन करण्याऐवजी कोमट पाणी प्यावे. यामुळे पोटाच्या समस्या कमी होतात आणि बद्धकोष्ठतेचा त्रासही कमी होतो. 5 / 75. फॅट्स होतात बर्न - जॉब, घरातली कामे या सर्व घाईगडबडीत महिलांचे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. यामुळे शरीरात अतिरिक्त चरबी वाढते. ही चरबी घटवायची असल्यास कोमट पाण्याचं सेवन करावे. दररोज सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यात लिंबूचा रस मिसळून प्यावे.6 / 76. कोरड्या त्वचेची समस्या - त्वचा उजळ आणि मऊ असावी, अशी प्रत्येक महिलेची इच्छा असते. प्रदूषण, अपुरा पौष्टिक आहारामुळे त्वचेच्या समस्या निर्माण होतात. यामुळे बऱ्याचदा त्वचा कोरडी होऊ लागते. सतेज आणि नितळ त्वचेसाठी कोमट पाणी पिण्याची सवय लावून घ्यावी. यामुळे त्वचा उजळेल आणि मुरुमांचाही त्रास कमी होईल7 / 77. हिवाळ्यात सांधे दुखीचा त्रास अधिक होतो. या त्रासातून वाचण्यासाठी कोमट पाणी प्यावे. तुम्हाला आराम मिळेल. कोमट पाण्याच्या सेवनामुळे हाय कोलेस्ट्रॉलचा त्रासही कमी होतो.