शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

तोंडाच्या दुर्गंधीमुळे चारचौघात होतो इज्जतीचा फालूदा, जाणून घ्या यामागची कारणं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 16:45 IST

1 / 8
Mouth Smell Causes : सकाळी झोपेतून उठल्यावर तोंडाची दुर्गंधी येणं सामान्य बाब आहे. पण जर दिवसभर तोंडाची दुर्गंधी येत असेल तर याकडे तुम्ही लक्ष देण्याची गरज आहे. अशात आधी तुम्हाला तोंडाची दुर्गंधी येण्याची कारणं माहीत असली पाहिजे.
2 / 8
तोंडात बॅक्टेरियामुळे दुर्गंधी निर्माण होते. हे बॅक्टेरिया मुख्यपणे जिभेच्या मागे आणि दातांच्या मधे जमा असतात. जिथे दुर्गंधी निर्माण होते. जर दातांची स्वच्छता व्यवस्थित केली नाही तर तोंडाची दुर्गंधी येऊ शकते.
3 / 8
तोंडात योग्य प्रमाणात लाळ तयार न झाल्यानं तोंड कोरडं पडतं. ज्यामुळे बॅक्टेरियांचा विकास अधिक होतो आणि दुर्गंधी वाढते. हे सामान्यपणे रात्री किंवा जास्त तणावामुळे होतं.
4 / 8
हिरड्यांमध्ये सूज, दातांमध्ये इन्फेक्शन किंवा कीड यामुळेही तोंडाची दुर्गंधी येऊ शकते. दातांना कीड आणि हिरड्यांमध्ये इन्फेक्शन बॅक्टेरियासाठी परफेक्ट वातावरण तयार करतात.
5 / 8
जेवणात कच्चा लसूण, कांदा आणि मसालेदार पदार्थ खाल्ल्यास तोंडाची दुर्गंधी येऊ शकते. त्याशिवाय साखरेचे पदार्थ अधिक खाल्ल्यानंही तोंडात बॅक्टेरिया वाढतात.
6 / 8
पाणी कमी पित असाल तरीही तोंडाची दुर्गंधी येते. त्यासाठी योग्य प्रमाणात पाणी प्यावं. ज्यामुळे लाळ जास्त प्रमाणात तयार होते.
7 / 8
कोणता आजार असेल तरीही तोंडाची दुर्गंधी येऊ लागते. जसे की, डायबिटीस, पोटाची समस्या, किडनीची समस्या किंवा लिव्हरसंबंधी आजार असेल तर तोंडाची दुर्गंधी येते.
8 / 8
तंबाखू, सिगारेट किंवा दारूमुळेही तोंडाची दुर्गंधी येते. या गोष्टींचं सेवन केल्यानं लाळ तयार होण्यावरही प्रभाव पडतो.
टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य