लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2019 17:21 IST
1 / 6कान दुखणं किंवा कानातून पाणी येणं यांसारख्या समस्या थंडीमध्ये अनेकांना उद्भवतात. अशावेळी काय करावं हे सुचत नाही. अनेकांना वाटतं की, कानामध्ये मळ साचल्यामुळे कान दुखत आहे. त्यामुळे ते बर्ड किंवा एखाद्या काडीच्या सहाय्याने कान स्वच्छ करण्याचा प्रयत्न करतात. पण असं करणं महागात पडू शकतं. त्यामुळे असं करण्याऐवजी तुम्हा काही घरगुती उपाय करू शकता. 2 / 6कान दुखत असल्यास जवसचं तेल गरम करून त्याचे 2 ते 3 थेंब कानामध्ये टाकल्याने कानाच्या सर्व समस्या दूर होतात. 3 / 6300मिली मोहरीच्या तेलामध्ये 50 ग्रॅम सुंठ, हिंग एकत्र करा. त्यानंतर हे तेल गाळून थेंब कानामध्ये टाकल्याने कानाच्या वेदना दूर होतील. 4 / 6आलं बारिक वाटून त्याचा रस कापडाने गाळून घ्या. त्यानंतर हा रस कोमट गरम करून त्याचे 3 ते 4 थेंब कानामध्ये टाका. त्यामुळे कानाच्या वेदना दूर होतील. 5 / 6ऑलिव्हच्या पानांचा रस गरम करून त्याचे काही थेंब पाण्यामध्ये टाकल्याने कान दुखण्याची समस्या दूर होते. 6 / 6अर्जुन वृक्षाच्या पानांचा रस आणि कवठाच्या झाडाच्या पानांचा रस एकत्र करून कोमट गरम करा. या रसाचे काही थेंब कानामध्ये टाका. कान दुखण्याची समस्या दूर होईल.