Corona Vaccine : कोरोना लसीमुळे तरुणांचा होतो अचानक मृत्यू? AIIMS आणि ICMR च्या रिसर्चमधून मोठा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 15:27 IST
1 / 8भारतात तरुणांचा अचानक मृत्यू होण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. याच दरम्यान दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) आणि इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) यांनी केलेल्या संयुक्त रिसर्चमधून महत्त्वाची माहिती मिळाली आहे. 2 / 8प्राथमिक निष्कर्षांवरून असं दिसून येतं की हे मृत्यू कोरोना लसीकरणाशी संबंधित नाहीत. हा रिसर्च शेअर करताना, एम्स दिल्ली येथील पॅथॉलॉजी विभागाचे प्राध्यापक डॉ. सुधीर अरवा यांनी सांगितलं की, अचानक मृत्यू हे कोरोना लसीकरणाशी जोडलेले नाहीत.3 / 8'आम्ही तरुणांमध्ये अचानक मृत्यू होण्याच्या मुख्य कारणांचं विश्लेषण केलं आणि असं आढळलं की हार्ट अटॅक हे यामागचं मुख्य कारण आहे. जेव्हा कोरोनरी धमन्या ब्लॉक होतात तेव्हा हृदयाचं सामान्य कार्य थांबतं, ज्यामुळे अचानक मृत्यू होतो' असं डॉ. अरवा यांनी म्हटलं आहे.4 / 8हा रिसर्च वर्षभर चाललेल्या अभ्यासावर आधारित होता आणि त्याचे निकाल आयसीएमआर जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहेत. रिसर्चमध्ये असंही स्पष्ट केलं गेलं आहे की, आतापर्यंत भारतात अशा कोणत्याही अचानक मृत्यूचं डॉक्युमेंटेश झालेलं नाही, मात्र एम्समध्ये केलेल्या रिसर्चमध्ये त्यांचं डॉक्युमेंटेश करण्यात आलं आहे.5 / 8तरुणांमध्ये अचानक मृत्यू होण्याची इतर संभाव्य कारणं स्पष्ट करताना, डॉ. अरवा म्हणाले की, जीवनशैली हे एक प्रमुख कारण असू शकतं. आज तरुणांमध्ये जास्त प्रमाणात मद्यपान, अनियमित खाण्याच्या सवयी आणि शारीरिक हालचालींचा अभाव दिसून येत आहे, ज्यामुळे हार्ट अटॅक येऊ शकतो. 6 / 8आपल्याला आपली जीवनशैली सुधारण्याची गरज आहे. डॉ. अरवा पुढे स्पष्ट करतात की, अनुवांशिक विश्लेषणावर आधारित रिसर्च देखील चालू आहे आणि त्याचे निकाल या समस्येचे आणखी पैलू उघड करू शकतात.7 / 8 जेव्हा संशोधकांना विचारण्यात आले की कोरोना लसीकरण आणि तरुणांमध्ये अचानक मृत्यू यांच्यात काही संबंध आहे का, तेव्हा डॉ. अरवा म्हणाले, 'आम्ही ही शक्यता विचारात घेतली, परंतु आमच्या रिसर्चमधून स्पष्टपणे दिसून आलं की हे मृत्यू कोरोना लसीकरणाशी संबंधित नव्हते.'8 / 8'या रिसर्चमधून हे सिद्ध झालं आहे की कोरोना लसीकरण हे तरुणांमध्ये अचानक मृत्यूचं कारण नाही.' कोरोना व्हायरसमुळे लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.