1 / 8Alum in bathing water : तुम्ही अनेकांना हे सांगता ऐकलं असेल की, काही कापलं असेल तर तुरटी लावा, आंघोळीच्या पाण्यावर तुरटी फिरवा. पण खरंच आंघोळीच्या पाण्यात तुरटी फिरवल्याने काय फायदा होतो हे अनेकांना माहीत नसतं. तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तुरटीचा वापर फार आधीपासून केला जातो. जेव्हा औषधांचा वापर कमी होता तेव्हा अनेक समस्या दूर करण्यासाठी तुरटी मलमाचं काम करत होती.2 / 8अनेकांना हे माहीत नसतं की, तुरटी केस, त्वचा आणि दातांसाठी खूप फायदेशीर असते. जर तुम्ही रोज आंघोळीच्या पाण्यात तुरटी फिरवली तर शरीराची दुर्गंधी, शरीरावरील घाण दूर होते. 3 / 8जर तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागल्या असतील तर सकाळी तुरटीच्या पाण्याने आंघोळ करावी. इतकंच नाही तर तुरटीच्या पाण्याने त्वचेची मालिश करा. सुरकुत्या गायब होतील.4 / 8काही रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आलं आहे की, तुरटीच्या पाण्याने सांधेदुखी दूर होते आणि नसा चांगल्या राहतात. कोमट पाण्यात तुरटी फिरवून आंघोळ केल्याने सांधेदुखी कमी होते.5 / 8तुरटीमध्ये अॅंटी-बॅक्टेरिअल गुण असतात. हे केस आणि डोक्याची त्वचा स्वच्छ करण्यासाठी मदत करतात. ज्या लोकांच्या डोक्यात उवा आहेत आणि ज्यांना कोंड्याची समस्या आहे त्यांनी आंघोळीच्या पाण्यात तुरटी फिरवून आंघोळ करावी.6 / 8महिलांना नेहमीच यूरिन इन्फेक्शनची समस्या होत असते. अशात दिवसातून दोन वेळा तुरटीच्या पाण्याने प्रायव्हेट पार्ट स्वच्छ केले तर फायदा मिळेल.7 / 8काही लोकांना उन्हाळ्यात खूप जास्त घाम येतो. पण हिवाळ्यातही काहींना घाम येतो. अशात तुरटी घामाला कंट्रोल करू शकते. ज्यांना जास्त घाम येतो त्यांना तुरटी फिरवलेल्या पाण्याने आंघोळ करावी.8 / 8तुरटीने खोकल्याची समस्याही दूर होते. तुरटीच्या पाण्याने गुरळा केल्याने घशातील खवखव दूर होते. तुरटीचं पावडर मधासोबत चाटलं तर खोकल्याची समस्याही लगेच दूर होऊ आराम मिळतो.