Disease X: वैज्ञानिकांनी दिला घातक व्हायरसचा इशारा, जाऊ शकतो ७ कोटींपेक्षा जास्त लोकांचा जीव
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2021 11:29 IST
1 / 11कोरोना व्हायरस महामारी (Coronavirus Pandemic) दरम्यान वैज्ञानिकांनी एका नव्या घातक व्हायरसबाबत इशारा दिला आहे. हा व्हायरस मनुष्यांसाठी जीवघेणा ठरू शकतो आणि कोरोना व्हायरसपेक्षाही अधिक वेगाने पसरू शकतो. 2 / 11या व्हायरसचं नाव आहे डिजीज एक्स (Disease X). वैज्ञानिकांचं मत आहे की, हा आजार इबोला व्हायरससारखा घातक ठरू शकतो.3 / 11WHO ने अंदाज व्यक्त केला आहे की, दरवर्षी या आजाराचे जवळपास एक अब्ज केसेस समोर येऊ शकतात. आणि लाखो लोकांचा यात मृत्यू होऊ शकतो. 4 / 11हेल्महोल्टज् सेंटरचे डॉक्टर जोसेफ सेटल यांनी द सन ऑनलाइनला सांगितले की, 'जनावरांची कोणतीही प्रजाती या आजाराचा स्त्रोत असू शकते. 5 / 11जिथे उंदीर आणि वटवाघळं जास्त असतात तिथे याची जास्त शक्यता आहे. ते म्हणाले की, हा आजार प्रजातीच्या अनुकूलन क्षमतेवर निर्भर करते'.6 / 11सध्या या आजाराबाबत फार जास्त माहिती समजू शकली नाही. पण वैज्ञानिकांचं मत आहे की, हा अज्ञात आजार पुढील महामारी ठरू शकतो. याचा एक रूग्ण कांगोमध्ये आढळून आला होता. 7 / 11कांगोत आढळून आलेल्या रूग्णाला ताप आणि सोबतच इंटरनल ब्लीडिंग होत होती त्याने इबोलाची टेस्ट केली होती. जी निगेटिव्ह आली होती.8 / 11वैज्ञानिकांना भीती आहे की, पुढील महामारी ब्लॅक डेथपेक्षाही घातक असू शकते. ज्यात ७.५ कोटी लोकांचा मृत्यू झाला होता. आणि डिजीज एक्स व्हायरस यापेक्षा जास्त घातक ठरू शकतो. 9 / 11इतकेच नाही तर मानवजातीला येणाऱ्या काळात दर पाच वर्षांनी आरोग्य संकटाचा सामना करावा लागू शकतो. EcoHealth Alliance नुसार, जगात असलेल्या १.६७ मिलियन अज्ञात व्हायरसपैकी ८२७००० प्राण्यांमधून मनुष्यात आले आहेत.10 / 11कोविड- १९ याचं उदाहरण आहे की, कशाप्रकारे प्राण्यांमधून मनुष्यांमद्ये पोहोचला आणि कशाप्रकारे मानवाला याचा फटका बसला.11 / 11 बर्ड फ्लू, SARS, MERS, Nipah आणि यलो फीवर सगळीच व्हायरसची सामान्य उदाहरणे आहेत. जे आधी प्राण्यांमध्ये उत्पन्न झाले होते आणि नंतर मनुष्यात पोहोचले.