शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

छातीत दुखणे, हाय बीपी केवळ हेच नाहीत हार्ट अटॅकचे संकेत, 'ही' 6 आहेत माहीत नसलेली काही लक्षण....

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2022 4:03 PM

1 / 8
कार्डिओवस्कुलर डिजीजचे काही माहीत असलेले संकेत जसे की, हाय बीपी, तणाव आणि डायबिटीस इत्यादी आहेत. जे सामान्यपणे अनेकांना माहीत असतात. पण याशिवायही काही असे संकेत असतात ज्याबाबत जास्त लोकांना माहिती नसते. लोक सामान्यपणे या धोकादायक कारणांकडे फारसं लक्षच देत नाहीत.
2 / 8
पण जर तुम्ही यांकडे लक्ष देणं सुरू करत असाल तर तुम्ही त्यांचा तुमच्या जीवनात काही बदल करण्यासाठी वापर करू शकता. बऱ्याच वर्षांपासून हृदयरोगांना रोखण्यासाठी खूप काही केलं जात आहे. हे असामान्य बदल लक्षात ठेवून तुम्हाला हे माहीत नसेल की, स्वत:ला वाचवण्यासाठी काय करावं लागतं. आम्ही तुम्हाला हार्ट अटॅकची काही आश्चर्यकारक लक्षणं सांगणार आहोत. ज्याबाबत तुम्ही आधी ऐकलं नसेल.
3 / 8
लैंगिक रोग - जर तुम्हाला बेडवर तुमच्या परफॉर्मन्समध्ये समस्या असेल, हा मुद्दा तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी चिंतेचा विषय आहे. जेव्हा रक्तवाहिन्या योग्यप्रकारे काम करत नाहीत तेव्हा लैंगिक समस्या निर्माण होतात. त्यामुळे यानंतर या समस्येकडे गंभीरतेने बघा आणि वेळीच योग्य ते उपचार करा.
4 / 8
टक्कल - केसगळती - केसगळती किंवा टक्कल पडण्यामागेही रक्तप्रवाह बरोबर नसणे हे कारण असू शकतं. एका रिसर्चनुसार, टक्कल पडणे आणि हृदयरोग यात संबंध आहे.
5 / 8
स्लीप एपनिया - एका रिसर्चमध्ये आढळून आलं की, स्लीप एपनिया किंवा घोरणाऱ्या लोकांमध्ये श्वसनमार्गात अडथळा हा हृदयरोगाशी संबंधित होता. हे हृदयरोगांच्या आश्चर्यकारक लक्षणांपैकी एक आहे.
6 / 8
प्लास्टिकच्या वस्तूंमध्ये जेवणं-पिणं - प्लास्टिकमध्ये बीसपेनॉल ए नावाचं केमिकल आढळून येतं. जे अणुसारखं एस्ट्रोजन तयार करू शकतं. ज्यामुळे महिलांमध्ये हृदयरोगाचा धोका वाढू शकतो.
7 / 8
मायग्रेन - नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चमधून समोर आलं की, ज्या महिलांना महिन्यातून एकदा मायग्रेनचा त्रास होतो, त्यांना हृदयरोग होण्याचा धोका दुप्पट असतो.
8 / 8
वैवाहिक तणाव - नात्यात नियमितपणे एखाद्या कारणावरून वाद पेटत असेल तर महिलांच्या हृदयावर वाईट परिणाम होतो. एका रिसर्चमधून समोर आलं की, वैवाहिक तणावाने ग्रस्त महिलांमध्ये हृदयरोगाचे अतिरिक्त लक्षण दिसून आले होते.
टॅग्स :Heart Attackहृदयविकाराचा झटकाHeart DiseaseहृदयरोगHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य