म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
वजन घटवण्याची आहे घाई?, सकाळी नाश्त्यामध्ये खा हे 5 पदार्थ
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2018 15:14 IST
1 / 5ओट्स इडली : इडली पौष्टिक असा पदार्थ आहे. सकाळी-सकाळी कार्यालय गाठण्याची घाई असेल आणि नाश्ता बनवण्यासाठी वेळ मिळत नसल्यास खूप कमी वेळेत ओट्स इडली बनवता येते. ओट्ससोबत काही भाज्यांचादेखील समावेश करू शकता. ओट्स इडली दहीसोबत खाऊ शकतो. यामुळे पचनक्रिया सुधारते शिवाय वजनदेखील नियंत्रणात राहण्यास मदत होते. 2 / 5ओम्लेट पराठा : अंड हे प्रथिनांचं उत्तम स्त्रोत मानलं जातं. त्यामुळे नाश्तामध्ये अंड्याचा समावेश जरुर करावा. उकडलेले अंड खाऊन कंटाळा आला असेल तर ओम्लेट पराठा नाश्तामध्ये खाऊ शकता. मात्र, पराठा करताना तेलाचा जास्त वापर करू नये. 3 / 5लापशीमुळेही शरीरास भरपूर प्रमाणात प्रोटीन मिळतात. दुधाच्या मदतीनं लापशी बनवणार असाल तर साखरऐवजी मधाचा वापर करावा. 4 / 5 सोया उत्तपा : नाश्त्यामध्ये सोया उत्तपा खाल्यास दिवसभरासाठी भरपूर ऊर्जा मिळते. शिवाय, वजन नियंत्रणात राहण्यासही मदत होते. या उत्तपामध्ये हिरव्या भाज्यांचाही समावेश करता येऊ शकतो. 5 / 5बेसनचा डोसा नाश्त्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. दुपारच्या जेवणातही बेसन डोसा खाऊ शकता. पण हा डोसा बनवताना तेलाचा जास्त वापर करू नये.